सध्या देशात कंपन्यांमधील वर्क कल्चर आणि कामाचे तास यावर जोरदार चर्चा सुरु आहे. L&T चे चेअरमन एसएन सुब्रमण्य यांच्या कामाच्या तासांबद्दलच्या वक्तव्यावरुन वाद-विवाद सुरु आहे. आठवड्यातून 90 तास काम करण्याचा सल्ला सुब्रमण्यम यांनी दिला होता.
या सर्व चर्चा सुरु असताना सिंगापूरमधील टॅटलर एशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (COO) परमिंदर सिंग यांनी देखील एक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. एका उमेदवाराने CV मध्ये 'गिटार वाजवणे आणि धावणे' छंद असल्याचं लिहिलं होतं. बॉसच्या सांगण्यावरुन मी या उमेदवाराला नोकरी नाकारली होती, असं परमिंदर सिंग यांनी सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
परमिंदर सिंग यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये लिहिलं की, भारतातील एका कंपनीत मार्केटिंग टीमचा भाग असताना ही घटना घडली होती. एका उमेदवाराने मार्केटिंग टीममधील पदासाठी अर्ज केला होता. परंतु माझ्या बॉसने त्याला नोकरी देण्याची परवानगी दिली नाही. सिंग यांच्या म्हणण्यानुसार, उमेदवाराने त्याच्या सीव्हीमध्ये लिहिलं होतं की, तो मॅरेथॉन धावतो आणि गिटार वाजवतो. यावर त्यांच्या बॉसने 'याने हे सगळे केले तर कधी काम करणार' असे म्हणत या उमेदवाराला नोकरी देण्यास नकार दिला होता.
(नक्की वाचा- Exclusive : "दाक्षिणात्य कर्मचाऱ्यांना प्राध्यान्य", Infosys कंपनीवर गंभीर आरोप करत IT इंजिनिअरचा राजीनामा)
परमिंदर सिंग यांनी पुढे म्हटलं की, एका सक्षम उमेदवाराला नोकरी देऊ शकलो नाही याबद्दल मनापासून खेद वाटला. अनेक वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. मी भारतापासून दूर होतो आणि मला वाटले की परिस्थिती बदलली असेल. मात्र काहीच बदललं नाही, असं दिसतंय.
परमिंदर यांनी कोणत्याही कंपनी अथवा आपल्या त्या बॉसचा देखील उल्लेख पोस्टमध्ये केलेला नाही. मात्र ती कंपनी गुगल नव्हती हे त्यांनी स्पष्ट केले आहे. कारण गुगलच्या धोरणांचे त्यांने कौतुक केले आहे.
(नक्की वाचा- घरी बसून बायकोला किती वेळ बघत बसणार ? 90 तास काम करा! L&T चेअरमन यांचा सल्ला)
कोण आहेत परमिंदर सिंग?
परमिंदर सिंग यांनी 6 वर्षांहून अधिक काळ Google मध्ये काम केले. ते एशिया पॅसिफिक बिझनेस हेड होते. याशिवाय त्यांनी तीन वर्षे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर (X) चे प्रमुख म्हणूनही काम केले. अॅपल कंपनीतही उच्च पदावर काम करण्याचा त्यांना अनुभव आहे.