जाहिरात
This Article is From Apr 16, 2024

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर, आदित्य श्रीवास्तव देशात पहिला; यंदा टॉप 3 मध्ये मुलांची बाजी

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या तीन टप्प्यात सामील झालेले विद्यार्थी upsc.gov.in आणि  upsconline.nic.in वर आपला अंतिम निकाल पाहू शकतात.

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर, आदित्य श्रीवास्तव देशात पहिला; यंदा टॉप 3 मध्ये मुलांची बाजी
नवी दिल्ली:

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या तीन टप्प्यात सामील झालेले विद्यार्थी upsc.gov.in आणि  upsconline.nic.in वर आपला अंतिम निकाल पाहू शकतात. UPSC CSE 2023 च्या निकालात एकूण 1143 तरुणांची निवड करण्यात आली आहे. या सर्वांना IAS, IPS, IFS, ग्रुप A, ग्रुप B साठी नोकरीच्या ऑफर केल्या जातील. 

केंद्रीय लोकसेवा आयोग 2023 निकालात आदित्य श्रीवास्तव देशात पहिल्या क्रमांकावर आहे. अनिमेश प्रधान देशात दुसरा आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुलांची बाजी मारल्याचं दिसून येत आहे.  UPSC च्या टॉप करणाऱ्या यादीत अधिकतर नावं पुरुषांची आहेत. केंद्री लोकसभा आयोगाची वेबसाइट upsc.gov.in वर सर्व अपडेट्स पाहता येतील. 

केंद्रीय लोकसभा आयोगाच्या परीक्षात यंदा 1016 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 347 उमेदवार खुल्या वर्गाचे, 116 उमेदवार आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे, 303 उमेदवार ओबीसी, 165 उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गाचे तर 86 उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आहेत. 
2022 मध्ये हेच आकडे -
खुला वर्ग - 354
आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग – 28
ओबीसी –52
अनुसूचित जाती – 5
अनुसूचित जमाती –4

Listen to the latest songs, only on JioSaavn.com