- मध्य रेल्वेने 1 जूनपासून स्टेशनवरील वडा पावसह विविध खाद्यपदार्थांच्या किंमती वाढवल्या आहेत
- 50 ग्रॅमच्या एका बटाटा वड्याची किंमत आता 15 रुपये करण्यात आली आहे आणि नवीन मेनू लागू होईल
- व्हेज सामोसा, व्हेज पफ, साबुदाणा वडा, पावभाजी आणि मसाला डोसा यासह अनेक स्नॅक्सचे दर वाढले आहेत
Central Railway News: मध्य पूर्वेतील संकटामुळे वाढत्या पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरांनंतर आता लोकांच्या आवडीचे खाद्यपदार्थही महाग होऊ लागले आहेत. सामान्य माणसाला मोठा झटका देत मध्य रेल्वेने वडा पावचे दर वाढवण्यास मंजुरी दिली आहे. आता 1 जूनपासून मध्य रेल्वेच्या स्टेशनवर वडा पाव महाग होणार आहे. मध्य रेल्वेने आपल्या 'मायनर स्टॅटिक कॅटरिंग' स्टेशनवर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किंमतींमधील बदलाला मंजुरी दिली आहे. नवीन दर लागू झाल्यानंतर 50 ग्रॅमच्या एका बटाटा वड्याची किंमत 15 रुपये केली जाईल. 1 जूनपासून स्टेशनवर नवीन मेनू आणि सुधारित दर पूर्णपणे लागू होतील.
वडा पावच नाही, 'हे' स्नॅक्सही झाले महाग
मध्य रेल्वेने वडा पावव्यतिरिक्त इतरही अनेक स्नॅक्सच्या किंमती वाढवल्या आहेत. मेनूतील अन्य लोकप्रिय स्नॅक्समध्ये व्हेज सामोसा 20 रुपये, व्हेज पफ 20 रुपये आणि साबुदाणा वडा 20 रुपयांना मिळणार आहे. प्रवाशांच्या आवडता पदार्थ पावभाजी आता 50 रुपये आणि व्हेज पिझ्झा देखील 50 रुपये या नवीन किंमतीत विकला जाईल. दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये मसाला डोसा 35 रुपये आणि इडली सांबार/चटणीची किंमत 30 रुपये निश्चित करण्यात आली आहे. मात्र मिसळ पाव (35 रुपये), कचोरी (15 रुपये) आणि दाबेली (20 रुपये) अशा काही पदार्थांच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
(नक्की वाचा : Nautapa 2026: नवतपाच्या 9 दिवसांत चुकूनही घालू नका 'हे' 3 रंगांचे कपडे, रीसर्चमधील धक्कादायक माहिती समोर)
किंमत तर वाढवली, पण एक आदेशही दिला
रेल्वे प्रशासनाने आदेश दिला आहे की किंमतींमधील या वाढीसोबतच वेंडर्सना (स्टॉलधारकांना) खाद्यपदार्थांच्या दर्जामध्येही सुधारणा करावी लागेल. प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व स्टॉलधारकांना आपल्या दुकानांवर द्विभाषिक (दोन भाषांमध्ये) रेट लिस्ट लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. स्टेशनवर प्रवाशांकडून जास्त पैसे उकळण्याच्या तक्रारींना आळा घालण्यासाठी आणि खाद्यपदार्थांचा दर्जा तपासण्यासाठी नियमित तपासणी केली जाईल.
33 खाद्यपदार्थांच्या दरात वाढ, 1 जूनपासून लागून होणार नवी दर
- बटाटा वडा (1 नग) 50 ग्रॅम - 15 रुपये
- रगडा/ उसळ प्लेट + 1 पाव 100 ग्रॅम - 25 रुपये
- व्हेज सामोसा (1 नग) 50 ग्रॅम - 20 रुपये
- पाव (1 नग) 35 ग्रॅम - 5 रुपये
- व्हेज सँडविच + सॉस 125 ग्रॅम - 35 रुपये
- व्हेज-चीज सँडविच + सॉस 190 ग्रॅम - 45 रुपये
- व्हेज पफ / पॅटिस 60 ग्रॅम - 20 रुपये
- साबुदाणा वडा (1 नग) 40 ग्रॅम - 20 रुपये
- ढोकळा 100 ग्रॅम - 25 रुपये
- सर्व प्रकारचे लाडू 30 ग्रॅम (प्रत्येकी) - 20 रुपये
- व्हेज फ्रँकी 80 ग्रॅम - 30 रुपये
- व्हेज चीज फ्रँकी 150 ग्रॅम - 45 रुपये
- सुकी भेळ 100 ग्रॅम - 25 रुपये
- चटणी भेळ 150 ग्रॅम - 30 रुपये
- पोहे 100 ग्रॅम - 20 रुपये
- साधा डोसा (प्लेन) + चटणी + सांबार 60 ग्रॅम - 25 रुपये
- मसाला डोसा + चटणी + सांबार 150 ग्रॅम - 35 रुपये
- कांदा डोसा / उत्तपम + चटणी / सांबार 110 ग्रॅम - 30 रुपये
- रवा डोसा / मसाला उत्तपम + चटणी + सांबार 150 ग्रॅम - 35 रुपये
- रवा इडली + चटणी + सांबार (2 नग) 60 ग्रॅम (प्रत्येकी) - 35 रुपये
- पावभाजी (2 पाव) 150 ग्रॅम - 50 रुपये
- दही वडा (2 नग) (100 ग्रॅम दही) 30 ग्रॅम (प्रत्येकी) - 35 रुपये
- व्हेज कटलेट (2 नग) + सॉस / चटणी 50 ग्रॅम (प्रत्येकी) - 35 रुपये
- छोले पुरी (5 पुरी + 120 ग्रॅम छोले) 220 ग्रॅम - 40 रुपये
- मेदू वडा + चटणी / सांबार (2 नग) 50 ग्रॅम (प्रत्येकी) - 35 रुपये
- इडली सांबार / चटणी (2 नग) 50 ग्रॅम (प्रत्येकी) - 30 रुपये
- चना डाळ वडा + चटणी (2 नग) 40 ग्रॅम (प्रत्येकी) - 35 रुपये
- ब्रेड पकोडा 80 ग्रॅम - 25 रुपये
- कांदा भजी 80 ग्रॅम - 25 रुपये
- मूग भजी 80 ग्रॅम - 30 रुपये
- व्हेज रोल 100 ग्रॅम - 30 रुपये
- व्हेज पिझ्झा 125 ग्रॅम - 50 रुपये
- टोमॅटो सूप 100 ml - 20 रुपये
मध्य रेल्वेने खालील 16 पदार्थ+पेयांच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही
- पॉपकॉर्न 35 ग्रॅम 10 रुपये
- फ्लेव्हर्ड पॉपकॉर्न 20 रुपये
- कचोरी (40 ग्रॅम) 15 रुपये
- गुलाबजाम /रसगुल्ला (35 ग्रॅम) 15 रुपये
- ज्युस (गाजर, अननस, आंबा, कलिंगड) 200ml 25 रुपये
- फाऊंटन सोडा 200ml 10 रुपये
- फ्लेव्हर्ड सोडा 200ml 15 रुपये
- फ्रेश मोसंबी/संत्री/सफरचंद 200ml 40 रुपये
- रवा उपमा+चटणी+ सांबार 150 ग्रॅम 25 रुपये
- उपमा (महाराष्ट्रीयन) 100 ग्रॅम 25 रुपये
- दाबेली 80 ग्रॅम 20 रुपये
- डोनट विथ क्रीम 70 ग्रॅम 15 रुपये
- Slush 150 ग्रॅम 30 रुपये
- सॉफ्टी 125 ग्रॅम 20 रुपये
- व्हेज नुडल्स 150 ग्रॅम 50 रुपये
- मिसळ पाव 150 ग्रॅम 35 रुपये
मध्य रेल्वेवर या गोष्टी आता खायला मिळणार नाही (Following items are deleted from A-la-carte menu as these items are shortlisted under PAD items)
- चणे
- शेंगदाणे
- सर्व प्रकारचे फरसाण
- सर्व प्रकारच्या चिक्की
- मिल्क शेक (रोझ, व्हॅनिला, चिकू)
मध्य रेल्वेने जारी केले पत्रक
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world