Chhattisgarh Encounter: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे. यापूर्वी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. छत्तीसगड राज्यातील कांकेर जिल्ह्यामध्ये सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 29 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. दरम्यान या चकमकीत तीन जवान जखमी झाल्याचीही माहिती आहे. ही चकमक कांकेरमधील छोटेबेठिया पोलीस स्टेशन हद्दीतील बिनागुंडा आणि कोरोनारच्या हापटोला जंगलामध्ये झाली.
तीन जवान जखमी
एडीजी (नक्षल ऑपरेशन) विवेकानंद सिन्हा यांनी सांगितले की,चकमकीमध्ये अनेक नक्षलवादी मारले गेले आहेत. जखमी जवानांची प्रकृती आता स्थिर आहे. जखमी जवानांवर उत्तम उपचार व्हावेत याकरिता आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात येत आहे. यासोबतच परिसरात सध्या शोधमोहीम सुरू आहे. दरम्यान ही चकमक मंगळवारी (16 एप्रिल 2024) दुपारी 2 वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलीस महानिरीक्षकांकडून 29 नक्षलवादी ठार केल्याचा दावा
बस्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले की, छोटेबेठिया पोलीस स्टेशन हद्दीतील बिनागुंडा आणि कोरोनार गावांच्या मध्य हापटोला जंगलामध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 29 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. माओवाद्यांच्या उत्तर बस्तर विभागातील नक्षलवादी शंकर, ललिता, राजूसह अन्य नक्षलवादी परिसरात असल्याची माहिती सुरक्षादलाला मिळाली होती. या माहितीनंतर बीएसएफ आणि डीआरजीचे संयुक्त पथक छोटेबेठिया पोलीस स्टेशन परिसरामध्ये गस्तीवर पाठवण्यात आले. मंगळवारी (16 एप्रिल) दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हे पथक हापटोला गावाच्या जंगलामध्ये असताना नक्षलवाद्यांकडून सुरक्षादलाच्या जवानांवर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यास जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले.
#WATCH जगदलपुर, बस्तर (छत्तीसगढ़): आईजी बस्तर पी सुंदरराज ने कहा, "अब तक 29 सीपीआई माओवादी कैडरों के शव बरामद किए जा चुके हैं... भारी मात्रा में हथियार और गोला-बारूद बरामद किया गया है... सभी घायल सुरक्षाकर्मियों का इलाज चल रहा है... इसे अब तक की सबसे बड़ी मुठभेड़ों में से एक के… https://t.co/IKS89tpB5y pic.twitter.com/OSPtqIWHuG
— ANI_HindiNews (@AHindinews) April 16, 2024
संपूर्ण देश पूर्णतः नक्षलमुक्त होईल - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
"छत्तीसगडमध्ये सुरक्षादलाच्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी मारले गेले आहेत. हे ऑपरेशन आपल्या शौर्याने यशस्वी करणाऱ्या सुरक्षादलाच्या सर्व जवानांचे मी अभिनंदन करतो आणि जखमी झालेल्या धाडसी पोलिसांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करतो", अशी पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जवानांचे कौतुक केले आहे.
आज छत्तीसगढ़ में सुरक्षा बलों के ऑपरेशन में बड़ी संख्या में नक्सली मारे गये हैं। इस ऑपरेशन को अपनी जाँबाज़ी से सफल बनाने वाले सभी सुरक्षाकर्मियों को बधाई देता हूँ और जो वीर पुलिसकर्मी घायल हुए हैं, उनके शीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूँ।
— Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) April 16, 2024
नक्सलवाद विकास, शांति और युवाओं के…
नक्षलवादावरील हा 'सर्जिकल स्ट्राइक' - उपमुख्यमंत्री विजय शर्मा
छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा (DCM Vijay Sharma) यांनी सुरक्षा दलाच्या जवानांकडून करण्यात आलेल्या या चकमकीला नक्षलवादावरील 'सर्जिकल स्ट्राइक' असे म्हटले आहे. उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी म्हटले की, कांकेरच्या दक्षिण भागामध्ये आणि नारायणपूरच्या उत्तर परिसरातील माडच्या एका भागामध्ये ही मोहीम राबवण्यात आली. या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी मारले गेले. याचे श्रेय मी सुरक्षादलाच्या जवानांना देऊ इच्छितो. सीआरपीएफ (CRPF), डीआरजी (DRG), सीएएफ (CAF) जवानांच्या ताकदीमुळे हे शक्य झाले आहे. यासाठी मी पोलीस अधिकाऱ्यांचेही कौतुक करतो. मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही कार्य करत आहोत. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मोठे मार्गदर्शन आहे."
आणखी वाचा
आरोपींनी सलमान खानच्या घराची 3 वेळा केली रेकी : मुंबई पोलीस
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी कुठे व कशा आवळल्या? वाचा सविस्तर
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या 2 आरोपींना गुजरातमधून अटक, क्राइम ब्रांचची मोठी कारवाई
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world