Shocking News: नवरा-बायको घरात आढळले मृतावस्थेत; भिंतींवर एक नाव, मोबाईल नंबर अन् मुलांसाठी खास मेसेज

पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट देखील मिळाली आहे. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, मृतांनी घराच्या भिंतीवर लिपलस्टिकने एक धक्कादायक मेसेज लिहिला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

छत्तीसगडमधील बिलासपूर शहरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे.पती-पत्नीचे मृतदेह संशयास्पद स्थितीत घरात आढळून आले आहेत. सरकंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अटल आवास कॉलनी येथील एका घरात ही घटना घडली. ज्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

मृत पतीचे नाव राज तांबे आणि पत्नीचे नाव नेहा उर्फ शिवानी तांबे आहे. जवळपास 10 वर्षांपूर्वी दोघांनी प्रेमविवाह केला होता. दोघेही एका खासगी कंपनीत सफाई कर्मचारी म्हणून काम करत होते. या जोडप्याला तीन लहान मुले आहेत. सोमवारी राज आणि नेहा यांचे मृतदेह त्यांच्या घरात सापडले. नेहाचा मृतदेह पलंगावर पडलेला होता, तर राजचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. 24 नोव्हेंबरच्या दुपारपर्यंत घरातून कोणी बाहेर न आल्याने, मृत महिलेची आई रीना चिन्ना मुलीला पाहण्यासाठी पोहोचल्या. दरवाजा उघडून त्या आत गेल्यावर त्यांना हे भयंकर दृश्य दिसले.

(नक्की वाचा- Viral VIDEO: फोनवरचं बोलणं ऐकून Uber ड्रायवरने गाडी थांबवली अन्... तरुणीच्या आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण)

भिंतीवर लिहिलेला मेसेज

पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट देखील मिळाली आहे. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, मृतांनी घराच्या भिंतीवर लिपलस्टिकने एक धक्कादायक मेसेज लिहिला होता. भिंतीवर राजेश विश्वास नावाच्या एका व्यक्तीचे नाव आणि मोबाइल नंबर नमूद केला होता. पतीने आपल्या मृत्यूसाठी त्याच व्यक्तीला जबाबदार धरले आहे.

भिंतीवर लिहिलेल्या संदेशानुसार, पत्नीचे त्या व्यक्तीसोबत फोनवर बोलणे होत असल्याने पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. या मेसेजमध्ये तिन्ही लहान मुलांसाठी एक भावनिक संदेशही लिहिला होता. "राजेश विश्वासमुळे आम्ही मरत आहोत. बाळांनो I Love You."

Advertisement

(नक्की वाचा- WhatsApp वापरणाऱ्यांनो सावधान! नेहमीची सवय आयुष्य उद्ध्वस्त करू शकते)

हत्येची आणि आत्महत्येची शक्यता

पोलिस आणि फॉरेंसिक टीमने घटनास्थळी पोहोचून पुरावे गोळा केले. फॉरेंसिक तपासणीत पत्नीच्या गळ्यावर ओरखड्याच्या खुणा आढळल्या आहेत. यावरून पोलिसांना असा संशय आहे की, पतीने प्रथम गळा दाबून पत्नीची हत्या केली असावी आणि त्यानंतर स्वतः फाशी लावून आत्महत्या केली असावी. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांमध्ये चारित्र्यावर संशय असल्यामुळे वारंवार वाद होत होते. या घटनेमुळे तिन्ही लहान मुले एका क्षणात पोरकी झाली आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, राजेश विश्वास या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Advertisement
Topics mentioned in this article