
सुल्ताना बेगम हिने आपण मुघल सम्राट बहादूर शाह जफर (दुसरा) याचे आपण कायदेशीर वंशज असल्याचा दावा करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. बहादूर शाह जफरच्या पणतूची आपण विधवा असल्याचा सुल्तानाचा दावा आहे. हादूर शाह जफर याची वंशय असल्याने देशाची राजधानी दिल्ली इथे असलेल्या लाल किल्ल्याची मालकी आपल्याला देण्यात यावी अशी मागणी केली होती. यापूर्वी तिने ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयात केली होती. तिथे याचिका फेटाळून लावल्यानंतर तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवीरल सुनावणीदरम्यान बरंच नाट्य घडलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सरन्यायाधीश काय म्हणाले ?
सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी याचिकेवर सुनावणी करत असताना म्हटले की फक्त लाल किल्ला कशाला मागत आहात. तुम्ही फतेहपूर सिक्री, ताज महालदेखील का मागत नाही ? या मुद्दावर तुम्ही युक्तिवाद व्हावा अशी इच्छा व्यक्त करत आहात का ? असा सवालही त्यांनी विचारला. सरन्यायाधीशांनी बहादूर शाह जफर (दुसरा) ची वंशज असल्याचे सांगत सुल्ताना बेगम हिने याचिका दाखल केली होती. सुल्ताना ही मूळची कोलकात्यातील हावडाची रहिवासी आहे. 2021 साली सुल्तानाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सरकार या याचिकेचा सहानुभूतीपूर्वक विचार करेल आणि आपल्याला आर्थिक मदत करेल अशी सुल्तानाने अपेक्षा व्यक्त केली होती.
लालकिल्ल्याची मालकी मिळाली
लाल किल्ला हे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. या किल्ल्याची मालकी आपल्याला मिळावी अशी सुल्तानाची मागणी आहे. सुल्तानाने तिच्या याचिकेमध्ये म्हटले होते की, 1857 साली लाल किल्ला ब्रिटीशांनी बळजबरीने आपल्याकडे घेतला होता. अडीचशे एकर परिसरात लाल किल्ला असून सुल्तानाचं म्हणणं आहे की लाल किल्ल्यावर ताबा मिळवल्यानंतर इंग्रजांनी बहादूर शाह जदफर याला अटक करून रंगून येथील तुरुंगात पाठवलं होतं. त्यानंतर हा किल्ला ब्रिटीशांच्याच ताब्यात होता. भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या किल्ल्याची मालकी भारत सरकारकडे आली होती.
150 वर्ष उशीर का केलात ?
दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सुल्तानाने याचिका दाखल केली होती, तेव्हा न्यायमूर्ती रेखा पल्ली यांनी म्हटले होते की, माझा इतिहास जरा कच्चा आहे, मात्र तुमच्या म्हणण्यानुसार 1857 साली ब्रिटीशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने तुमच्या पूर्वजांवर अन्याय केला होता. मग यासंदर्भात दावा करण्यासाठी 150 पेक्षा जास्त वर्षे का लागली ? यावर सुल्ताना यांचे वकील विवेक मोर यांनी म्हटले होते की, ही मंडळी विदेशातून भारतात परत आल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सुल्ताना बेगम यांचे पती मिर्झा बेदर बख्त यांना पेन्शनची व्यवस्था करून दिली होती. त्यांच्या निधनानंतर ही पेन्शन सुल्ताना यांना मिळू लागली. सध्या सुल्ताना यांना पेन्शनपोटी फक्त 6 हजार रुपये मिळत असून यात त्या त्यांचा उदरनिर्वाह कशा करू शकतील असं त्यांचे वकील यावेळी म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world