
देवा राखुंडे, पुणे: प्रस्थापित पुरंदर विमानतळाला बाधित गावातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध पाहायला मिळत असून प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष सुरु आहे. यावेळी पोलीस प्रशासनाकडून लाठी चार्ज करण्यात आला. या घटनेनंतर विरोधक आक्रमक झाले असून शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट निशाणा साधला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले अंबादास दानवे?
"पुरंदरपासून अवघे 36 किलोमीटर पुण्याचे विमानतळ आहे ज्यांना फिरायची फार हौस असेल त्यांनी इथून 60 किलोमीटर अंतरावर बारामतीचे विमानतळ आहे ते मोठे करावे. इकडून तिकडं जायला गद्दारी करायला तुम्हाला पळावे लागतं गुपचूप अमित शहा नरेंद्र मोदी यांना भेटावं लागतं त्यामुळे बारामतीचे विमानतळ मोठे करा अशा शब्दात अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. सरकारला सजेशन करीत बारामतीच्या विमानतळाचे विस्तारीकरण करा पुरंदरला विमानतळाची गरज नाही," असा टोलाही त्यांनी लगावला...
त्याचबरोबर "पुरंदरची भूमी ही छत्रपती संभाजी महाराजांची जन्मभूमी आहे. तुम्ही जर औरंगजेबाच्या भूमिकेत असाल तर आम्ही छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका घेऊन आम्ही या मातीचा शेतीचा संस्कृतीचा लढा लढू अशा शब्दात त्यांनी सरकारला इशारा दिला.पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथे शेतकऱ्यांशी भेट घेतल्यानंतर ते बोलत होते.
नक्की वाचा - Melghat Jungle Safari : मेळघाट जंगल सफारीचा प्लान करताय? आधी ही बातमी वाचा!
"लोकांनी दोन-चार दगड मारले असतील तर तो इशू होतो मग तुम्ही काट्या मारल्या त्याचं काय? डोकी फोडली आठ आठ दहा टाके पडले त्याचं काय ? महिला भगिनींना मोठ्या प्रमाणात मारहाण झाली याचं काय ? सरकार अन्याय अतिरेक करून जमीन हस्तांतरणाचा प्रयत्न करते याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. आम्ही या विरोधात सोबत आहोत," असेही अंबादास दानवे यावेळी म्हणाले.
दरम्यान, "आमदाराच्या म्हणण्यान पोलिसांनी एवढं मोठं पावलं उचललं असेल मला असं वाटत नाही, पण राजकीय हेतून उचलला असेल तर आम्हाला ह्यात राजकारण करावसं वाटत नाही. आमदारांनाही सांगतो तुमचा मतदारसंघ आहे तुमच्या भागातील जनता आहे. त्यांच्या जीविताचे मालमत्तेचे संरक्षण करणे हे आमदाराचं काम आहे, असेही ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world