जाहिरात

CJP Protest: 2 तास बंद दारआड चर्चा, 3 मागण्या, 1 मागणीमुळे पेच? सरकारसोबत CJP ची चर्चा काय झाली?

पुढच्या एक दोन दिवसात राजीमाना झालाच पाहीजे. नाही झाला तर आम्हाला देशव्यापी आंदोलन पुकारावे लागेल असं ही या दोघांनी सरकारला सांगितलं.

CJP Protest: 2 तास बंद दारआड चर्चा, 3 मागण्या, 1 मागणीमुळे पेच? सरकारसोबत CJP ची चर्चा काय झाली?
नवी दिल्ली:

कॉकरोज जनता पार्टी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहे. आज केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या सोबत CJP च्या प्रवक्त्यांची बैठक झाली. या बैठकीत सीजेपीने आपण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीमान्यावर ठाम असल्याचं सांगितलं. आता आम्ही जास्त वाट पाहाणार नाही. पुढच्या दोन दिवसात प्रधान यांचा राजीमाना झाला पाहीजे. जर ते राजीनामा देणार नसतील तर त्यांना बरखास्त करा. हा निरोप पंतप्रधान मोदींना द्या असा मॅसेज या बैठकीत देण्यात आला आहे. जर तसे झाले नाही तर देशव्यापी आंदोलनाची हाक दिली जाईल असं ही या बैठकीत सीजेपीच्या प्रवक्त्यांनी सरकारच्या प्रतिनिधींना सांगितली. या बैठकीत तीन मागण्या करण्यात आल्या. त्यातील दोन मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं ही त्यांनी सांगितलं. 

CJP कडून प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी सरकारसोबत चर्चा केली. या बैठकीत त्यांनी तिन प्रमुख मागण्या ठेवल्या. त्यातील पहिली मागणी,  ज्या विद्यार्थ्यांनी निट पेपर लिक झाल्यानंतर आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई दिली जावी. दुसरी मागणी आंदोलना दरम्यान ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत ते मागे घेण्यात यावेत. तिसरी मागणी ही होती की धर्मेंद्र प्रधान यांचा तातडीने राजीनामा घेतला जावा. या तिन पैकी पहिल्या दोन मागण्यांना सरकारच्या प्रतिनिधींनी तत्वत: मान्यता दिल्याचे सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास आणि आषुतोष रांका यांनी सांगितले. मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत कोणतेही आश्वासन दिले नाही. त्यासाठी शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंतचा वेळ मागण्यात आला आहे. उद्या पुन्हा याबाबत चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आल्याचे ही या दोघांनी बैठकीनंतर सांगितले. ही बैठक जवळपास दोन तास चालली. 

नक्की वाचा - Paper Leak Law: पेपर लीक प्रकरणी मोदी सरकारचा मोठा निर्णय, सोमवारी संसदेत बिल येणार, वाचा काय असेल तरतूद?

आशुतोष रांका यांनी बैठकीत काय घडलं याची माहिती जंतरमंतर इथं उपस्थित आंदोलकांना दिली. त्यात त्यांनी सांगितलं की बैठकीचा बहुतांश वेळ हा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्या वरील चर्चेत गेला. निट परिक्षा पेपर लिक  झाल्यानंतर  21 मुलांनी आत्महत्या केल्या. त्याला जबाबदार कोण? कोणी त्याची जबाबदारी घेणार की नाही? त्यामुळेच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीमान हा अनिवार्य आहे असं रांका यांनी नड्डा यांना सांगितलं. ते राजीमाना देणार नसतील तर त्यांना बरखास्त करा अशी मागणी ही आम्ही केली. ही मागणी आता देशाची मागणी आहे असं ही रांका म्हणाले. आता आम्ही जास्त वेळ थांबणार नाही. पुढच्या एक दोन दिवसात राजीमाना झालाच पाहीजे. नाही झाला तर आम्हाला देशव्यापी आंदोलन पुकारावे लागेल असं ही या दोघांनी सरकारला सांगितलं.  

राजीनामा झाला नाही तर यावेळचं आंदोलन आता पेक्षा निश्चितच मोठं असेल. सरकारला आम्हाला जसं समजवायचं होतं तसं समजवलं आहे. ते समजले ही असतील. शिवाय आमचा हा मेसेज तुम्ही पंतप्रधान मोदींना द्यावा असं ही सांगितल्याचं रांका म्हणाले. प्रधान यांच्या राजीनाम्या शिवाय आम्हाला काही मंजूर नाही. राजीमाना घेतल्या शिवाय आम्ही जंतर मंतर वरून जाणार नाही.  पुढच्या मिटींग नंतर आम्ही राजीनाम्यासह इथं येवून असा विश्वास ही त्यांनी आंदोलन करणाऱ्या तरुणांना यावेळी दिला. आपण संघर्ष करू. आपण जिंकू. विजय आता खूप जवळ आहे. त्यामुळे थोडी कश सोसा. राजीमाना निश्चितच होईल असं त्यांनी यावेळी जंतरमंतरवर बोलताना सांगितलं. 

नक्की वाचा - Vande Mataram: 'वंदे मातरम'चा अपमान केलात तर जावं लागेल जेल! किती वर्षाची शिक्षा अन् काय आहेत नियम?

दुसरीकडे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांना एक कोटीची भरपाई द्या.  शिवाय आंदोलकांवर असलेले गुन्हे मागे घ्या अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या दोन मागण्यांना सरकारने तत्वत: मान्यता दिली आहे. सरकार या मागण्याबाबत सकारात्मक आहे. दरम्यान सरकारकडून जेपी नड्डा यांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधी मंडळासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं. आम्ही त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. त्यांच्या मागण्या ही समजून घेतल्या आहेत.  सरकार त्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक आहे. काही गोष्टींसाठी आम्ही पुन्हा उद्या भेटणार असल्याचं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मात्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत बोलणं त्यांनी यावेळी टाळलं. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com