Tamil Nadu Election: थलपती विजयच्या TVK ला काँग्रेसचा पाठिंबा; मात्र ठेवली मोठी अट

Congress Announced Support TVK: अभिनेता विजय यांचा पक्ष TVK ला काँग्रेसने काही अटींवर हा पाठिंबा जाहीर केला असून, 7 मे रोजी चेन्नईच्या नेहरू स्टेडियमवर विजय यांचा शपथविधी सोहळा पार पडण्याची शक्यता आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्तास्थापनेची समीकरणे स्पष्ट झाली आहेत. सुपरस्टार विजय यांच्या 'तमिलगा वेत्री कळघम' (TVK) या पक्षाने सर्वाधिक 108 जागा जिंकून सर्वांचे लक्ष वेधले आहे. आता बहुमत गाठण्यासाठी आवश्यक असलेल्या जागांची उणीव काँग्रेसच्या पाठिंब्याने भरून काढली जाणार आहे. काँग्रेसने अधिकृतपणे विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे.

काँग्रेसची एक अट

काँग्रेसने TVK ला दिलेला पाठिंबा बिनशर्त नसून, त्यासाठी एक महत्त्वाची अट ठेवली आहे. एआयसीसी (AICC) प्रभारी गिरीश चोडणकर यांनी स्पष्ट केले की, "ज्या शक्तींचा भारताच्या संविधानावर विश्वास नाही, अशा कोणत्याही सांप्रदायिक शक्तीला या युतीपासून दूर ठेवावे लागेल." या अटीवरच काँग्रेसचे 5 आमदार विजय यांच्या सरकारला पाठिंबा देतील. ही युती केवळ या सरकारपुरती मर्यादित नसून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीतही कायम राहील.

Advertisement

(नक्की वाचा-  DMart VIDEO: डीमार्टमध्ये जात असाल तर सतर्क राहा! एक चूक महागात पडेल)

राहुल गांधींच्या उपस्थितीत रंगणार सोहळा?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. विजय यांनी सरकार स्थापनेसाठी काँग्रेसकडे पाठिंबा मागितला होता, ज्यावर मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर तमिळनाडू काँग्रेस कमिटीने पाठिंब्याचा औपचारिक निर्णय घेतला. या बदल्यात काँग्रेसला नव्या मंत्रिमंडळात दोन मंत्रीपदे मिळण्याची शक्यता असून, गिरीश चोडणकर आणि प्रवीण चक्रवर्ती यासंदर्भात चर्चा करत आहेत.

7 मे रोजी शपथविधी

विजय 7 मे रोजी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. गुरुवारचा मुहूर्त शुभ असल्याने त्याच दिवशी हा सोहळा चेन्नईच्या प्रसिद्ध नेहरू स्टेडियमवर आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. यामुळेच TVK च्या सर्व आमदारांना चेन्नई सोडून न जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

(नक्की वाचा-  Dombivli News: खाऊ आणायला गेलेली आई आलीच नाही; 3 चिमुरड्यांचे रस्त्यावरच रडून-रडून हाल!)

तामिळनाडू विधानसभेतील संख्याबळ

  • TVK - 108 जागा (सर्वात मोठा पक्ष)
  • DMK - 59 जागा
  • AIADMK - 47 जागा
  • काँग्रेस - 5 जागा
     
Topics mentioned in this article