जाहिरात

Iran War : शांतता, भारतीयांची सुरक्षा अन् उर्जा वाहतूक; PM मोदींचा इराणच्या राष्ट्रपतींना फोन!

पंतप्रधानांनी इराणसह या प्रदेशातील भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि कल्याणाला भारताचे प्राधान्य अधोरेखित केले, तसेच ऊर्जा आणि वस्तूंच्या निर्बाध वाहतुकीचे महत्त्व देखील अधोरेखित केले.

Iran War : शांतता, भारतीयांची सुरक्षा अन् उर्जा वाहतूक; PM मोदींचा इराणच्या राष्ट्रपतींना फोन!

New Delhi:  मध्यपूर्वेतील वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्रपती डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्याशी चर्चा केली. या वाढत्या तणावाबद्दल आणि नागरी पायाभूत सुविधांना होणाऱ्या नुकसानाबद्दल तीव्र चिंता व्यक्त करताना पंतप्रधान मोदींनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी संवाद आणि राजनैतिकतेची आवश्यकता असल्याचे  आवाहन केले. हिंसाचार हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही आणि भारत शांतता आणि स्थैर्य पुनर्संचयित करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे, असं आश्वासन यावेळी PM मोदींनी दिले. 

पंतप्रधान मोदींचा इराणच्या राष्ट्रपतींना फोन 

समोर आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इराणच्या इस्लामिक रिपब्लिकचे अध्यक्ष महामहिम डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या संवादात राष्ट्रपती पेझेश्कियान यांनी पंतप्रधानांना इराणमधील सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली आणि प्रदेशातील अलीकडील घडामोडींबद्दल त्यांचा दृष्टिकोन मांडला.

Akola News: देशभर सिलिंडरचा तुटवडा आणि अकोल्यात एकापाठोपाठ 8 फुटले; लाखोंची राख? शहरात एकच चर्चा

तसेच पंतप्रधन मोदींनी या प्रदेशातील बदलत्या सुरक्षा परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आणि सर्व समस्या संवाद आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीद्वारे सोडवल्या पाहिजेत या भारताच्या सातत्यपूर्ण भूमिकेचा पुनरुच्चार केला. तसेच  पंतप्रधानांनी इराणसह या प्रदेशातील भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि कल्याणाला भारताचे प्राधान्य अधोरेखित केले, तसेच ऊर्जा आणि वस्तूंच्या निर्बाध वाहतुकीचे महत्त्व देखील अधोरेखित केले.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे.  "इराणचे अध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्याशी बोललो आणि या प्रदेशातील गंभीर परिस्थितीवर चर्चा केली. वाढता तणाव, नागरिकांचे जीवितहानी आणि नागरी पायाभूत सुविधांना झालेल्या नुकसानाबद्दल चिंता व्यक्त केली. भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि वस्तू आणि ऊर्जा (तेल आणि वायू) च्या अखंड वाहतुकीची आवश्यकता ही भारताची सर्वोच्च प्राथमिकता आहे. शांतता आणि स्थिरतेसाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि संवाद आणि राजनैतिकतेद्वारे समस्यांचे निराकरण करण्याचे आवाहन केल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितले. 

( नक्की वाचा : Doctor Suicide: दादरचा पिझ्झा,ताजमध्ये बर्थडे अन् अलिबागची ट्रीप; फैझीलच्या 'त्या' सवयीनं स्तुतीचा घेतला जीव! )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com