काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधीचं पॅलेस्टाईन प्रेम पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे. त्यांचा संसदेतील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात प्रियांका गांधी यांच्या खांद्यावर एक बॅग दिसून येत आहे. ज्यात पॅलेस्टाईन समर्थनार्थ एक घोषणा लिहिलेली आहे. या बॅगवरुन भाजप त्यांना ट्रोल करीत आहे. यावर प्रियांका गांधींनीही प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, मी कोणते कपडे घालायचे, हे कोण ठरवणार? मला जे आवडेल ते कपडे मी घालणार.
नक्की वाचा - "गांधी कुटुंबाने माझी कारकिर्द घडवली आणि बिघडवलीही", मणिशंकर अय्यर यांचं खळबळजनक वक्तव्य
केरळच्या वायनाडचे खासदार प्रियांका गांधी यांनी सोमवारी संसदेत पॅलेस्टाईन समर्थनार्थ एक हँडबॅग घेऊन पोहोचल्या. पॅलेस्टाईन स्वतंत्र होईल... असं त्यांच्या बॅगवर लिहिलं होतं. त्यांच्या हँडबॅगेवर कबुतर, कलिंगड, पॅलेस्टाईन डिझाइन असल्याचं दिसत आहे. ही सर्व चिन्ह शांततेची प्रतिकं मानली जातात. या बॅगेवर पॅलेस्टाईन झेंड्याचा लाल, हिरवा, पांढरा आणि काळा रंगदेखील आहे.
नक्की वाचा - इंदिरा गांधी संविधानविरोधी होत्या? श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना सवाल, लोकसभेत जोरदार गदारोळ
भाजप नेते काय म्हणाले?
न्यूज एजन्सी IANS नुसार, भाजप खासदार गुलाम अली खटाना म्हणाले, लोक बातम्यांमध्ये राहण्यासाठी अशा गोष्टी करतात. लोकांनी त्यांना नाकारलं आहे, त्यामुळे बातम्यांमध्ये राहण्यासाठी त्यांना असं काही तरी करावं लागेल. केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल म्हणाले, प्रियांका गांधी मुस्लीम मतं मिळविण्यासाठी पॅलेस्टाईन बॅग घेऊन आल्या आहेत.
पॅलेस्टाईनमधील गाझा-हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मानवतेवर भीषण संकट ओढवलं. तब्बल सहा महिन्यांहून अधिक काळ हे युद्ध सुरू होतं. या युद्धात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world