जाहिरात
Story ProgressBack

धक्कादायक! अ‍ॅमेझॉनवर दिली ऑर्डर, पार्सल खोललं आत पाहतो तर...

अ‍ॅमेझॉनवर एक ऑर्डर दिली होती. ती ऑर्डर त्यांना मिळाली. जेव्हा त्यांना मिळालेले पार्सल त्यांनी खोलले तेंव्हा ते हबकून गेले.

Read Time: 2 mins
धक्कादायक! अ‍ॅमेझॉनवर दिली ऑर्डर, पार्सल खोललं आत पाहतो तर...
बंगळूरू:

बंगळुरूमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. इथे राहणाऱ्या एका इंजिनिअर जोडप्याने दावा केला आहे की त्यांनी अ‍ॅमेझॉनवर एक ऑर्डर दिली होती. ती ऑर्डर त्यांना मिळाली. जेव्हा त्यांना मिळालेले पार्सल त्यांनी खोलले तेंव्हा ते हबकून गेले. त्या पार्सल मधून एक जिवंत साप बाहेर आला. त्यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र त्यानंतर अॅमेझॉनने ही असे का झाले याचे स्पष्टीकरण दिले आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या इंजिनिअर जोडप्याने याबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांनी सांगितले आहे की दोन दिवसा पूर्वी आम्ही अ‍ॅमेझॉनवरून एक ऑर्डर दिली होती. ती ऑर्डर आम्हाला मिळाली. डिलिव्हरी बॉय ने आमचे पार्स आम्हाला घरी आणून दिले. बंगळूरूच्या सरजापूर रोडवर आम्ही राहतो. जेव्हा हे पार्सल आले तेव्हा आम्ही त्याचा व्हिडीओ बनवला. त्यात ही संपुर्ण घटना कैद झाली आहे. शिवाय आमच्या शेजाऱ्यांनीही हा प्रकार पाहीला आहे असे त्यांनी सांगितले. 

या प्रकरणी त्यांना रिफंड मिळाला आहे. मात्र या घटनेमुळे आम्ही घाबरून गेलो आहोत. शिवाय आपण खरोखर सुरक्षित आहोत का असा प्रश्नही त्यांनी केला आहे. एक विषारी साप आमच्या घरात आला होता. त्यातून काही अप्रिय झाले असते तर त्याची जबाबदारी कोणाची असा सवालही त्यांनी केला आहे. ही संपुर्ण चुक अ‍ॅमेझॉनची आहे. खराब नियोजन, स्वच्छता आणि वाहतूक याकडे अ‍ॅमेझॉनने दुर्लक्ष केले आहे. यात ग्राहकांची काही चुक नसताना त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. ही सुरक्षेची अ‍ॅमेझॉनकडून झालेली गंभीर चूक आहे. 

ट्रेंडिंग बातमी -  नाना पटोलेंचे पाय धुणारा कार्यकर्ता समोर आला, थेट बोलला

पार्सलमधून आलेल्या सापाचा व्हीडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हीडिओत पार्सलमध्ये अडकलेला साप दिसत आहे. तो बाहेर येण्याचा प्रयत्न करत असल्याचेही दिसत आहे. दरम्यान या दाम्पत्याला रिफंड मिळाला आहे. पण त्यातून ते समाधानी नाहीत. शिवाय अ‍ॅमेझॉननेही दिलगीरी व्यक्त केली आहे. पण त्याला काही अर्थ नाही. तुम्ही एक प्रकार ग्राहकांच्या भावनांबरोबर खेळ करत आहात असे या दाम्पत्याचे म्हणणे आहे. दरम्यान या व्हीडिओची एनडीटीव्ही पुष्टी करत नाही. या सापाला पकडले गेले आहे. शिवाय त्याला सुरक्षित ठिकाणी सोडले गेले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
खासदाराच्या मुलीने फुटपाथवर झोपलेल्या व्यक्तीला BMW कारने चिरडलं, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू
धक्कादायक! अ‍ॅमेझॉनवर दिली ऑर्डर, पार्सल खोललं आत पाहतो तर...
Assam Home Secretary Shiladitya Chetiya ended his life in ICU after his wife death due to cancer
Next Article
कर्करोगाने पत्नीचं निधन, काही मिनिटात ICU मध्येच आसामच्या गृहसचिवानेही स्वत:ला संपवलं!
;