
Delhi Assembly Elections Result 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने 48 जागा जिंकून प्रचंड विजय मिळवून इतिहास रचला आहे. 1993 नंतर पहिल्यांजा दिल्लीत भाजपचे (Delhi Election 2025) सत्तावापसी केली आहे. भाजपच्या या ऐतिहासिक यशामागे बूथ पातळीपासून मोठ्या स्तरापर्यंत तयारी करण्यात आली होती. भाजपने ही निवडणूक एका मिशनप्रमाणे लढली होती आणि इतर पक्षांच्या तुलनेत जबरदस्त प्लानिंक गेलं होतं. त्यांची हीच प्लानिंग आणि तयारीचा परिणाम म्हणजे भाजपला मिळालेलं जबदरस्त यश. रॅली असो वा रोड शो, मायक्रोमॅनेजमेंट लेव्हलवर काम करणे (BJP Planning for Delhi Election) आणि प्रत्येक पातळीवर तयारी असल्यामुळे भाजपने आपचा दिल्लीत सुपडा साफ केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर मोठी जबाबदारी...
दिल्ली विधानसभा निवडणुकीची जबाबदारी भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांकडे सोपवण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी दिल्लीत तीन रॅली घेतल्या होत्या. या रॅलीच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी विविध वर्गातील मतदारांशी संवाद साधला. भाजप दिल्लीत सत्तेत आली तर विकास निश्चित होईल असा विश्वास मोदींनी मतदारांच्या मनात निर्माण केला. याशिवाय अमित शहांनी दिल्लीत 16 रॅली घेतल्या, यात अनेक रोड शोही आहेत. जेपी नड्डा यांनी सहा रॅली घेतल्या. याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सहा रॅली घेतल्या.
नक्की वाचा - Delhi Election Results 2025 : दिल्लीत सलग तिसऱ्यांदा काँग्रेस शून्यावर आऊट, 67 मतदारसंघात भयंकर नामुश्की
आरएसएसनेही केला प्रचार..
आरएसएसने दहा हजारांहून अधिक ड्रॉइंग रूम बैठका घेतल्या. आरएसएसकडून मुस्लीम बुद्धिजीवींशी संपर्क साधण्यात आला. संघाने मित्र पक्षांची मदत घेतली. बिहार निवडणुकीच्या समन्वयात अडचणी येऊ नये यासाठी जेडीयू आणि एलजेपी यांना जागा देण्यात आल्या. प्रचारासाठी टीडीपी आणि जेडीयूच्या नेत्यांना बोलविण्यात आलं. चंद्राबाबू नायडू यांनी तेलगू भाषिक मतदारांशी संपर्क साधला. कर्नाटकातील भाजप नेत्यांना कन्नड भाषिक मतदारांशी संपर्क साधण्याची जबाबदारी देण्यात आली. उत्तराखंड भाजपच्या नेत्यांना पहाडी मतदारांशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले, थिंक टँक तयार करण्यात आला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world