जाहिरात
2 days ago

नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले असून यात आम आदमी पक्षाचा दारूण पराभव झाला आहे. या निवडणुकीत आपला केवळ 22 जागा (43.57%) राखता आल्या असून भाजप 48 जागांवर (45.56%) विजयी ठरला आहे. काँग्रेसला मात्र सलग तिसऱ्यांना शून्यावर आऊट व्हावं लागलं आहे. मात्र काँग्रेसमुळे  आपच्या १२ मतदारसंघातील मतांवर परिणाम झाला. त्यामुळे आपला सत्ता राखणं शक्य झालं नाही. दुसरीकड़े महाराष्ट्र दोन महिने पूर्ण झाले तरीही बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळू शकलेला नाही. या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. 

Raigad News: रायगडात भाजपचा शिवसेनेला दे धक्का, नाराज प्रकाश देसाई यांचा भाजपमध्ये प्रवेश

रायगड जिल्ह्यात भाजपने आपला मित्रपक्ष शिवसेनेला जोरदार धक्का दिलाय.  शिवसेनेतील नाराज माजी जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांना आपल्याकडे ओढण्यात भाजप यशस्वी झाला आहे. आज प्रकाश देसाई यांनी पाली येथील मेळाव्यात आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी खासदार धैर्यशील पाटील, आमदार विक्रांत पाटील, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. लोकांची कामे करण्यासाठी अपेक्षित ताकद मिळत नव्हती. त्यामुळे भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे प्रकाश देसाई यांनी सांगितलं. तर देसाई यांचा प्रवेश पक्षाला फलदायी ठरेल असं खासदार धैर्यशील पाटील यांनी सांगितलं.

Rohit Sharma Century: रोहित शर्माचे वादळी शतक! इंग्लडच्या गोलंदाजांची केली धुलाई

भारत आणि इंग्लंडमध्ये दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना सुरु आहे. इंग्लंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासमोर विजयासाठी 305 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या लक्षाचा पाठलाग करताना भारतीय संघाने जोरदार सुरुवात केली. या सामन्यात रोहित शर्माने शतकी खेळी केली आहे. 

Delhi Elections Result 2025: 'आप पक्ष इतिहास जमा, त्याला भविष्य नाही': भाजप नेत्याची टीका

दिल्लीतील जनतेने भ्रष्ट लोकांना पराभूत केले आहे. काँग्रेस आता पक्ष राहिलेला नाही, ते फक्त वेळ घालवत आहेत. तीन वेळा शून्य मते मिळवूनही स्वतःला हिरो समजणाऱ्यांबद्दल काय म्हणता येईल? काँग्रेस आता इतिहास झाला आहे, त्यांना भविष्य नाही.. असे म्हणत भारतीय जनता पक्षाचे नेते गौरव वल्लभ यांनी दिल्ली निकालावरुन टीका केली आहे. 

Ind Vs ENG ODI: टीम इंडियाचा भेदक मारा; इंग्लंडकडून 305 धावांचे आव्हान

भारत आणि इंग्लंडमध्ये दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना सुरु आहे. इंग्लंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासमोर विजयासाठी 305 धावांचे लक्ष्य ठेवले. इंग्लडकडून बेन डकेट आणि जो रूट यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. दोघांनीही अर्धशतके ठोकली. डकेट 65 धावा करून बाद झाला, तर रूट 69 धावा करून बाद झाला. जोस बटलरने 34 धावांचे योगदान दिले. हॅरी ब्रुक 31 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. अशाप्रकारे संपूर्ण संघ 304 धावा करून सर्वबाद झाला.

भारताकडून रवींद्र जडेजाने घातक गोलंदाजी केली. त्याने 10 षटकांत 35 धावा देत 3 बळी घेतले. जडेजानेही 1 मेडन ओव्हर टाकली. वरुण चक्रवर्तीने 10 षटकांत 54 धावा देत 1 बळी घेतला. भारताकडून मोहम्मद शमी, हर्षित राणा आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Sharad Koli: राहुल सोलापूरकरचे तोंड चपलीने फोडा, 1 लाख मिळवा: शरद कोळींची घोषणा

 शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या सोलापूरकरला फोडून काढा, राहुल सोलापूरकरचे तोंड चपलीने फोडा, असे म्हणत राहुल सोलापूर जिथे दिसेल तिथे त्याचे तोंड चपलीने रंगवणाऱ्या व्यक्तीला 1 लाखाचे बक्षीस मी जाहीर करतोय.. अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी केली आहे. 

Live Updates: जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात  भारतीय दंड संहिताचे कलम 153 अ  आणि 505 (2) अंतर्गत गुन्हा दाखल..

हिंदू टास्क फोर्सचे संस्थापक ॲड. खुश खंडेलवाल यांच्या तक्रारीवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल 2018 साली नालासोपारा येथून वैभव राऊतला एटीएस ने अटक केली होती. त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वैभव राऊत हा मराठा मोर्चात बॉम्ब फोडणार होता, असा दावा केला होता. 

 दोन समाजात शत्रुत्व निर्माण केल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती. मात्र खंडेलवाल यांच्या तक्रारीवरून भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला नाही. त्यानंतर खंडेलवाल यांनी न्यायदंडाधिकारी, ठाणे येथे फौजदारी याचिका दाखल केली. न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशा नंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाईंदर पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आली आहे..

Maharashtra Politics: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकिंसाठी काँग्रेस पक्ष सज्ज

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकिंसाठी काँग्रेस पक्ष सज्ज

काँग्रेस पक्षातील मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक आज बोलावली गेली आहे

विधानसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसला होता... मात्र महापालिका निवडणूकीत पक्ष जोमाने लागण्याच्या तयारीत आहे

मुंबई महापालिका निवडणूकीत शिवसेना पक्षाने स्वतंत्र लढण्याचा इशारा दिला आहे

या बैठकीत एकट्याने लढायचं की नाही यावर चर्चा केली जाणार....

Live Updates: नकली नोटांच्या छापखान्यावर इंदोरा पोलिसांची धाड

सात फेब्रुवारीला दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जरी पटका पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या चॉक्स कॉलनी येथे सुरू असलेल्या नकली नोटाच्या छापखान्यावर इंदोरा पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरून पोलिसांनी  मलकित विक्र व मनप्रीत सिंह कुलविंदर सिंह विक्र यासह इतर सहा आरोपींचा समावेश आहे. या सहा आरोपींना इंदोरा  पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून दोनशे रुपये, पाचशे रुपये, अशा दोन लाखांच्या नकली नोटा मशीन जप्त करण्यात आली आहे. आरोपी ऑर्डर प्रमाणे नोटा बनवून विविध भागात पाठवत होते.

Beed News: महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास एसआयटी,सीआयडी मार्फत करावा, बीड पोलीस अधीक्षकांकडे मागणी

आमच्या प्रकरणाची बीड पोलीस अधीक्षकांनी जास्तीत जास्त दखल घ्यावी.महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास  एसआयटी,सीआयडी मार्फत करावा नाहीतर आम्ही कुटुंबीय बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस प्रशासनाला दिलाय.

महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास अंबाजोगाईचे पोलीस उपाधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे देण्यात आला होता आम्ही त्यांना भेटलो होतो. मात्र आता त्यांच्याकडून आम्हाला न्यायची अपेक्षा नाही. आम्ही बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असून त्यानंतर त्यांना तीन दिवसाची मुदत देऊन पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Live Update: श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांचे वसईत निधन

देशभर गाजलेल्या श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी लढा देणारे श्रद्धाचे वडील विकास वालकर यांचे वसईत निधन झाले आहे.  विकास वालकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची प्राथमिक माहिती  समोर आली आहे. श्रद्धा वालकर हीची तिचा प्रियकर आफताब पूनावाला याने मे 2022 मध्ये हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे दिल्लीच्या मेहरौली जंगलात फेकले होते. दिल्ली पोलिसांनी श्रद्धाच्या मृतदेहाचे गोळा केलेले तुकडे अद्याप तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दीलेले नाहीत. आपल्या मुलीच्या आठवणीत त्यांनी गेल्या वर्षी "श्रद्धा वाकर चॅरिटेबल ट्रस्ट"ची स्थापना केली होती.  ही संस्था महिलांच्या सुरक्षे संदर्भात आणि पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर मदत करते.

Live Update : मका पिकाच्या आड केली जात होती गांजाची शेती, तब्बल 15,000 किलो गांजावर सांगवी पोलिसांची कारवाई

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या आंबेगाव परिसरात शिरपूर तालुका पोलिसांनी गांजाच्या शेतीवर कारवाई केली असून सुमारे तीन एकरवर गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त करण्यात येत असून मका या पिकांच्या ही गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तीन एकर क्षेत्रात कोट्यावधी रुपयांचा तब्बल 15000 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला असून या गांजाची मोजणी सांगवी पोलिसांकडून अद्यापही सुरू असून मध्यप्रदेश सीमेपासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर सांगवी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Live Update : एकनाथ शिंदे यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेकडून 61 कॉमन मॅनचा सत्कार

एकनाथ शिंदे यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेकडून 61 कॉमन मॅनचा सत्कार करण्यात येणार आहे. युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलंय. 

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Live Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ महिलांनी काढली दृष्ट

शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अहिल्यानगर महिला आघाडीच्या वतीने पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावे अशा शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच ज्येष्ठ महिलांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दृष्ट काढण्यात आली व त्यानंतर मंत्र उच्चारात पंचारती ओवाळून वाढदिवसानिमित्त औक्षण करण्यात आले

Live Update : पंचायत निवडणुकीपूर्वी, विजापूरच्या राष्ट्रीय उद्यान परिसरात एक मोठी चकमक

पंचायत निवडणुकीपूर्वी, विजापूरच्या राष्ट्रीय उद्यान परिसरात एक मोठी चकमक सुरू आहे

आतापर्यंत चकमकीत 12 हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत

 डीआरजी, एसटीएफ आणि बस्तर फायटर सैनिकांशी चकमक सुरू आहे

 आज सकाळपासून चकमक सुरू आहे, ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते

Live Update :मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर आढळलं संशयास्पद ड्रोन, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर आढळलं संशयास्पद ड्रोन, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Live Update : आनंदवन प्रकल्पाला 75 वर्षे, आज आनंदवनात मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांची उपस्थिती

आनंदवन प्रकल्पाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 2 दिवसीय आनंदवन मित्रमेळाव्याचं कार्यक्रम सुरू असून या कार्यक्रमाला आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योग मंत्री उदय सामंत वरोरामधील आनंदवनातील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. मुख्यमंत्री येत असल्याने  परिसरात पोलिसांचा चोक बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Live Update : मनसेच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार

मनसेच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार 

मनसे नेत्यांची शिवतीर्थ येथे राज ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका  आणि संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने  बैठक

Live Update : आदिवासी आश्रम शाळेत आमदारांनी केला मुक्काम

राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईक यांच्या संकल्पनेतून राज्यभर आयोजित केलेल्या संवाद चिमुकल्यांशी या अभियानांतर्गत शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी तळोदा तालुक्यातील अमोनी शासकीय आश्रम शाळेत रात्री मुक्काम करत आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Live Update : साई बाबांच्या शिर्डीत आज आंतरराष्ट्रीय सहकार परिषद

साई बाबांच्या शिर्डीत आंतरराष्ट्रीय सहकार परिषेद आज पार पडतेय. यासाठी राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सह राज्यभरातून तब्बल पंधरा हजार सहकारी क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. महत्वाचं म्हणजे आठ देशातील सहकार प्रतिनिधी सहकार परिषदेसाठी शिर्डीत दाखल झाले. 

Live Update : गांजा तस्करी करणाऱ्यांना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

गांजा तस्करी करणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रपूर - बल्लारपूर मार्गावर मुद्देमालासह अटक केली. गाडीच्या डिक्कीत पाच किलो ४७८ ग्रॅम हिरये कॅनाबिस गांजा वनस्पतीची पाने, फुले, बिया (गांजा) असा १ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लालचंद केसकर असे अटकेतील आरोपीचे नाव असून तो बल्लारपूर मधील आहे. गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात अली आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.