जाहिरात

Earthquake in Delhi : विचित्र आवाजाने दिल्लीवासी घाबरले, भूकंपाचे गूढ अधिक गडद झाले

Delhi Earthquake Tremors : दिल्ली-एनसीआर (Delhi - NCR Region) परीसर सोमवारी सकाळी भूकंपाने हादरला (Earthquake in Delhi). सकाळी सकाळी बसलेल्या भूकंपाच्या हादऱ्यांनी दिल्लीवासी घाबरले (Earthquake Tremors in Delhi-NCR Region ) आहेत. एका विचित्र आवाजाने या भूकंपाचे गूढ अधिक गडद झाले आहे.

दिल्ली-एनसीआर में भूकंप के तेज झटके

नवी दिल्ली:

Delhi Earthquake Tremors : दिल्ली-एनसीआर परीसर सोमवारी सकाळी भूकंपाने हादरला. सकाळी सकाळी बसलेल्या भूकंपाच्या हादऱ्यांनी दिल्लीवासी घाबरले आहेत. एका विचित्र आवाजाने या भूकंपाचे गूढ अधिक गडद झाले आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दिल्ली-NCR परिसरात सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के बसले. या धक्क्यामुळे घाबरलेले दिल्लीवासी घराबाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळत होते. या भूकंपामागची विविध खारणे असल्याचे सांगितले जात आहे. भूकंपाबाबत बोलत असताना अनेक दिल्लीकरांनी एक विचित्र आणि गूढ  आवाज ऐकू आल्याचे सांगितले आहे. भूकंपासोबतच हा आवाज ऐकू आल्याचे अनेकांनी म्हटले आहे. भूकंपाचे पहिले हादरे बसले तेव्हा हा आवाज ऐकू आला होता. हा आवाज कसला होता याचं मोठं कोडं निर्माण झालं आहे. भू-वैज्ञानिकच या आवाजामागील कोडं सोडवू शकतील. यापूर्वी जेव्हा भूकंपाचे हादरे जाणवले होते तेव्हा कधीही असा आवाज ऐकू आला नव्हता, हा आवाज पहिल्यांदाच ऐकू आल्याचे दिल्लीकरांचे म्हणणे आहे. 

नक्की वाचा : दिल्लीला वारंवार भूकंपाचा धोका का आहे? काय आहे कारण?

दिल्लीत नेमके काय घडले ?

  • दिल्ली आणि एनसीआर परिसरात पहाटे 5 वाजून 36 मिनिटांच्या आसपास भूकंपाचे तीव्र हादरे जाणवले. 
  • घाबरलेले नागरीक घराबाहेर आले होते
  • लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते
  • भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.0 इतकी नोंदवण्यात आली आहे.
  • भूकंपाचे केंद्र दिल्लीच असल्याचे सांगितले जात आहे.

भूकंपासोबत आलेल्या गूढ आवाजामुळे दिल्लीकर आणखी घाबरलेत, असा आवाज यापूर्वी कधी ऐकू आला नव्हता; तो आताच का ऐकू आला असा प्रश्न दिल्लीकरांना पडला आहे. भविष्यातील मोठ्या संकटाची ही वर्दी तर नाही ना अशीही चर्चा दिल्लीकरांमध्ये सुरू होती. दिल्लीच्या भूगर्भात काही अकल्पनीय हालचाली सुरू आहेत का ? असा प्रश्नही दिल्लीकरांना पडला असून भू-वैज्ञानिकच या जिज्ञासायुक्त प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील.   

नक्की वाचा : पुण्यातील प्रसिद्ध कॅफेमध्ये चॉकलेटच्या नावाखाली 'उंदीर शेक'ची डिलिव्हरी, विद्यार्थ्याची रुग्णालयात धाव!

दिल्ली-एनसीआर भूकंपाचे केंद्र जमिनीपासून 5 किलोमीटर खोलवर होते असे सांगितले जात आहे. यामुळे भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता जास्त होती. सुदैवाने या भूकंपात कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. या भूकंपाचे केंद्र धौला कुंआ असल्याचे कळते आहे. धौला कुआं परीसर यापूर्वीही भूकंपाच्या झटक्यांनी हादरला होता. धौला कुंआ परिसरात एक तलाव आहे याच तलावाखाली भूकंपाचे केंद्र असल्याचे बोलले जात आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: