
घरातील सामान भरायचं असेल तर ग्राहकांची पावले पहिले डीमार्टकडे वळतात. झेप्टो, ब्लिंकीट, इन्स्टामार्टसारख्या क्विककॉमर्सचा उदय झाल्यानंतर डीमार्टचे आकर्षण कमी झाले असावे असा अंदाज बांधला जात आहे. ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री करणाऱ्यांमध्ये डिस्काऊंटचे युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. या युद्धामध्ये ग्राहकांचा फायदा होताना दिसतआहे. मात्र सर्वाधिक डिस्काऊंट कोण देतं ? हा प्रश्न ग्राहकांसमोर पडणं स्वाभाविक आहे. या प्रश्नाचं उत्तर सापडलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
डिस्काऊंटचा बादशाह डीमार्ट
दोन महत्त्वाच्या शहरांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास सर्वाधिक डिस्काऊंट डीमार्ट देत असल्याचं स्पष्ट झालंय. मुंबईमध्ये डीमार्टमध्ये 16.2 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळतो. डीमार्टला टक्कर देण्यासाठी अनेकांनी सवलती देण्याचा प्रयत्न केला, मात्र या प्रयत्नासाठी त्यांना संघर्ष करावा लागतोय. Flipkart मिनिटसमुळे डिस्काऊंटची स्पर्धा अधिक तीव्र होत असून अमेझॉनने या स्पर्धेत प्रवेश केला तर ही स्पर्धा अधिकच तीव्र होणार आहे. मात्र या स्पर्धचा परिणाम डीमार्टच्या उत्पन्नावर होताना दिसतो आहे. IIFL कॅपिटलने ही स्थिती पाहाता डीमार्टच्या शेअरबद्दल फार सकारात्मक भूमिका घेतलेली नाही.
ट्रेंडींग बातमी : Womens Day 2025: लाडक्या बहिणींनो, गुंतवणुकीचे 'हे' 7 सर्वोत्तम पर्याय एकदा पाहाच
डीमार्टने स्पर्धेत टीकून राहण्यासाठी सवलतीचे प्रमाण 12.9 टक्क्यांवरून 16.2 टक्के केले आहे. तूर्तास यामुळे डीमार्टला स्पर्धेत टीकून राहण्यास मदत होताना दिसते आहे. मात्र याचा परिणाम डीमार्टच्या उत्पन्नावर होण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे झेप्टो, ब्लिंकीट सारख्या क्विककॉमर्सने आपल्या सेवेत बराच सुधार केल्याचे आणि नवी उत्पादने सादर केल्याचे दिसून आले आहे. फ्लिपकार्ट मिनिट मात्र या स्पर्धेत अजून चाचपडताना दिसत आहे. फ्लिपकार्ट मिनिटवर अनेकदा ग्राहकांना हवी असलेली उत्पादने मिळताना दिसत नाही अशी तक्रार आहे. ग्राहकांना आवश्यक त्या वजनाची उत्पादने मिळत नाही. हे प्रमाण 42 टक्के इतके असल्याचे दिसून आले आहे. जर ग्राहकांनी याबाबत तडजोड केली तर उत्पादनेच उपलब्ध नसल्याने ग्राहक वैतागण्याची शक्यता आहे.