Trump Tariffs : भारताला अमेरिकेचा धक्का, 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ; या क्षेत्रांना सर्वाधिक फटका बसणार

भारतावरील वाढलेल्या शुल्कामुळे भारताच्या निर्यातीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका ऑटो पार्ट्स, टेक्स्टाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स सारख्या उद्योगांना बसू शकतो.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • Initial tariffs start on August 7, additional tariffs begin 21 days later
  • Indian exports in auto parts, textiles, and electronics will face higher costs
  • Steel, chemical, and pharma industries in India may suffer significant setbacks
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Trump Raises Tariffs : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मोठा आर्थिक धक्का दिला आहे. रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरू ठेवल्याबद्दल भारतावर 25 टक्के अतिरिक्त आयात शुल्क लावण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. या निर्णयामुळे आता भारतीय वस्तूंवर असलेले एकूण शुल्क 50 टक्के इतके झाले आहे.

ट्रम्प यांनी बुधवारी यासंदर्भात एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. त्यांच्या या आदेशामुळे आधी लागू होणाऱ्या शुल्काव्यतिरिक्त हे अतिरिक्त शुल्क लावण्यात आले आहे. आधीचे 25 टक्के शुल्क 7 ऑगस्ट पासून लागू झाले आहे, तर हे नवीन 25 टक्के अतिरिक्त शुल्क 21 दिवसांनंतर लागू होईल. याचा अर्थ, 27 ऑगस्ट पासून भारताची आयात 50 टक्के अधिक महाग होणार आहे. ट्रम्प यांनी भारताच्या या निर्णयाला 'रशियाच्या युद्ध यंत्रणेला इंधन पुरवण्यासारखे' असल्याचे म्हटले आहे, आणि यावर ते खूश नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

(नक्की वाचा - Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडोला जबरा पर्याय! आता एसटी महामंडळाचे 'छावा राइड' ॲप)

भारतासाठी याचा कसा परिणाम होईल?

भारतावरील वाढलेल्या शुल्कामुळे भारताच्या निर्यातीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका ऑटो पार्ट्स, टेक्स्टाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स सारख्या उद्योगांना बसू शकतो. स्टील, केमिकल आणि फार्मा उद्योगांनाही मोठा फटका बसू शकतो, ज्यामुळे त्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागू शकतो.

(नक्की वाचा - Bhaskar Jadhav: 'बामदास छमछम'! भास्कर जाधवांनी रामदास कदमांना दिलं नवं नाव, केला मोठा गौप्यस्फोट)

या अतिरिक्त शुल्कामुळे अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार असंतुलन आणखी वाढू शकते. अनेक कंपन्या त्यांच्या सप्लाय चेनवर पुनर्विचार करण्याची शक्यता आहे. सध्या अमेरिकेच्या बाजारात 50 टक्के इतके सर्वाधिक शुल्क भारत आणि ब्राझीलवर लागू करण्यात आले आहे. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत भारताची निर्यातीच्या बाबतीत मागे पडू शकतो. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आणि अयोग्य आहे.

Advertisement

Topics mentioned in this article