
इलॉन मस्कची (Elon Musk) कंपनी स्टारलिंकची भारतामध्ये एन्ट्री होणार आहे. मस्क यांच्या स्पेसएक्सनं भारतीय टेलिकॉम कंपनी एअरटेलसोबत भागिदारी (Airtel-Starlink Deal) केली आहे. या माध्यमातून स्टारलिंक सॅटलाईट इंटरनेटला देशात लॉन्च करण्यात येईल. अर्थात अजूनही स्पेसएक्सला भारतीय प्राधिकरणाकडून परवाना मिळणे बाकी आहे. पण, स्टारलिंकनं देशात प्रवेश केला तर काय फायदा होणार? हे समजून घ्या.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
स्टारलिंक कंपनीला एअरटेलच्या माध्यमातून भारतामध्ये त्यांच्या उपकरणांची विक्री करता येईल. या भागिदारीचा दोन्ही कंपनीला फायदा होईल. एअरटेलला स्टारलिंकच्या पायाभूत सुविधा वापरता येतील. तर मस्कच्या कंपनीला भारतामध्ये विस्तार करणे सोपे होईल. त्याचबरोबर एअरटेलच्या सध्याच्या पायाभूत सुविधांचाही स्टारलिंकला फायदा होईल.
( नक्की वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचा इलॉन मस्क यांना कसा फायदा होणार? )
Airtel-Starlink Deal चा देशाला काय फायदा?
- देशात इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढेल.
- ग्रामीण आणि दुर्गम भागात हाय स्पीड ब्रॉडब्रँड सेवा मिळू शकेल.
- भारतामध्ये कमी दरात हाय-स्पीड ब्रॉडब्रँड सर्व्हिस मिळू शकेल.
- इंटरनेट स्पीड सध्यापेक्षा खूप जास्त असेल. अर्थात हे तुम्ही कोणत्या प्रकारचं पॅकेज घेणार यावर अवलंबून आहे.
- सामान्य व्यक्तींना कमी किंमतीमध्ये उपग्रह इंटरनेट सेवा मिळू शकेल.
- सध्या इंटरनेट तारेच्या माध्यमातून येते. त्यासाठी मॉडेमची आवश्यकता असते. आता ही सुविधा उपग्रहाच्या माध्यमातून मिळेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world