जाहिरात

Emotional story: मुलं 7 पण खांदा द्यायला एकच हात! 82 वर्षांच्या आईची ह्रदय पिळवटून टाकणारी कहाणी

नियतीपेक्षाही निर्दयी मुले कशी असतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे गेंदाबाई यांची मुले आहेत.

Emotional story: मुलं 7 पण खांदा द्यायला एकच हात! 82 वर्षांच्या आईची ह्रदय पिळवटून टाकणारी कहाणी

Vidisha Genda Bai Raghuvanshi: विदिशामधील एका वृद्धाश्रमाच्या चार भिंतींच्या आत, एका आईने आपला शेवटचा श्वास घेतला. नाव होते गेंदा बाई रघुवंशी, वय 82 वर्षे. आश्रमाबाहेर खूप गर्दी होती. पण गेंदाबाईंच्या खोलीत शांतता होती. त्याच शांततेत एका आईचे डोळे दरवाजाकडे लागून राहिले होते. गेंदाबाईंच्या सोबतच त्यांच्या शेवटच्या इच्छेनेही प्राण सोडले. जसे कोणीतरी येता-येता थांबले असेल. त्यांना सात-सात मुले होती. पण शेवटच्या वेळी त्यांच्या जवळ एकही मूल नव्हते. होता तो फक्त एकटेपणा. अश्रू होते. असहाय्यतेचे  मौन होते.  जे कोणत्याही आईचे हृदय फाडून टाकेल असेच होते. म्हणायला सात मुले- तीन मुलगे आणि चार मुली. पण आईच्या जवळ येण्यासाठी कोणालाही वेळ मिळाला नाही. या स्थितीचा विचार करूनच अंगावर काटा येईल. 

आईला ठेवण्यासाठी 'डील' झाली होती!
या आईची कहाणी ऐकले तर टचकरन डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहाणार नाही. गेंदाबाईंना सात-सात मुले होती. भरलेले कुटुंब होतं. सर्वजण आर्थिकदृष्ट्या सक्षम होते. तरीही आईला आधार देण्याचे धाडस कोणीही दाखवले नाही. काही दिवसांपूर्वी स्थानिक प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर एसडीमच्या उपस्थितीत एक करार झाला होता, की प्रत्येक मूल एक-एक महिन्यासाठी आईची सेवा करेल. पण नात्यांची ही 'डील' चार दिवसही टिकली नाही. मोठ्या मुलीने ऑटोमध्ये बसवून गेंदा बाईंना आश्रमाच्या गेटवर सोडून दिले.

आईची इच्छा अपूर्ण राहिली
गेंदाबाईंचीची इच्छा फक्त इतकी होती की एकदा आपल्या मुलांना बघून घ्यावे. एकदा कोणाचा तरी हात आपल्या माथ्यावर राहावा. कुणी तरी म्हणावे "आई, घरी चल". ती मुलांची वाट बघत बसायची. आपल्या अश्रूंना वाट करून द्यायची. तीचीनजर दरवाज्याकडे लागून राहिलेली असायची पण येत कोणी नव्हते. त्यामुळे त्यांची शारीरिक आणि मानसिक स्थिती बिघडत गेली. जेव्हा कोणताही अनोळखी चेहरा जवळ येई, त्या त्याला मुलगा किंवा नातवाच्या रूपात पाहू लागल्या.नंतर शांत होऊन खोलीत परत येत होत्या. श्री हरी वृद्धाश्रमाच्या भिंतींनी इतक्या गोष्टी पाहिल्या आहेत की, प्रत्येक वीट गेंदाबाईंचं दुख जाणत आहे. त्यांची घरा बाबत असलेली ओढ मात्र ओढच राहीली.  

नक्की वाचा - Shocking news: कपाळावर टिळा, नवे कपडे, रक्ताने भरलेला हात, जमिनीतून जिवंत बाहेर आली 15 दिवसांची चिमुकली

नियतीपेक्षाही निर्दयी मुले!
गेंदा बाईंनी एक वेळ स्वत: उपाशी राहून आपल्या  मुलांचे पोट भरले. आपली झोप सोडून त्यांचे शिक्षण पूर्ण केले. आपल्या इच्छांच्या चितेवर त्यांची स्वप्ने सजवली. पण जेव्हा त्यांचे वय झाले,कमी दिसायला लागले, पावले अडखळू लागली तेव्हा मुलांनी साथ सोडली. ज्या वेळी मुलं सोबत हवी होती त्यावेळी ते तिच्या सोबत नव्हते.  या आईची शेवटची इच्छा खूप साधी होती. मरण्यापूर्वी आपल्या मुलांचा चेहरा पाहणे. पण नियतीपेक्षाही निर्दयी मुले निघाली. वारंवार संदेश पाठवले गेले. हाका मारल्या गेल्या. पण कोणीही आले नाही. जेव्हा बातमी पोहोचली की आई आता या जगात नाही, तेव्हाही फक्त एक मुलगा अंतिम दर्शनासाठी आला. पण बाकीच्या मुलांना वाटले की एक टेंशन कायमचे संपले.

आई-वडिलांसाठी वेळ नाही!
गेंदा बाईंचा आश्रमातच शेवटचा निरोप देण्यात आला. त्यावेळी अश्रू बरोबर अंगावर काटा आल्या शिवाय राहात नाही. सात मुलांची आई, पण शेवटच्या क्षणी आईचे डोळे आपल्याच अंगणाला आसुसले. हा फक्त गेंदा बाईंचा मृत्यू नाही, हा आपल्या समाजाच्या कपाळावरचा कलंक आहे. प्रश्न सरळ आहे, काय आई-वडील फक्त मुलांच्या बालपणापर्यंतच आवश्यक असतात? आणि म्हातारपणात ओझे बनतात? मंदिरांमध्ये देवासाठी दिवा लावणाऱ्यांना, घराच्या अंगणात बसलेल्या आईच्या विझत चाललेल्या डोळ्यांकडे का पाहता येत नाही? गेंदा बाई गेल्या, पण त्यांचे जाणे प्रत्येक त्या मुलाच्या गालावर एक जोरदार फटका आहे, ज्यांच्याकडे आपल्या आई-वडिलांसाठी वेळ नाही.
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com