दिल्लीतून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या पित्याने जुळ्या नवजात बालकांची हत्या करुन मृतदेह पुरल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्लीतील पूठकला गावात ही घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पित्याला अटक केली आहे. नीरज सोलंकी असं आरोपीचं नाव आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हत्येचं कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला मुली नको होत्या. मात्र दोन जुळ्या मुली झाल्याने त्याला संताप अनावर झाला. एका व्यक्तीने आपल्या जुळ्या मुलींची हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन ज्याठिकाणी जुळ्या मुलींना दफन केलं होते तिथे तपासणी केली. तिथुन दोन्ही बाळांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यासाठी पोलिसांनी एसडीएमची परवानगी देखील घेतली.
(नक्की वाचा- पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, दारु पिऊन वाहन चालवल्यास परवाना थेट रद्दच होणार! )
घटनेनंतर आरोपी बाप फरार झाला होता अनेक दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. पोलिसांना आरोपी चकवा देत होता. पोलिसांपासून वाचण्यासाठी तो वारंवार आपला मोबाईल, सिम आणि ठिकाणे बदलत होता.
(नक्की वाचा -पुण्यातील 42 बांगलादेशी नागरिकांचे पासपोर्ट रद्द, 'त्या' एजंटने कसा काढून दिला भारतीय पासपोर्ट?)
पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी दिल्ली आणि हरियाणातील अनेक ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीत पोलिसांनी आरोपी नीरज सोलंकी याला रोहतकमधून अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने हत्येची कबुली दिली. पोलिसांना याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून कायदेशील प्रक्रिया सुर केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world