जाहिरात

Crime News : निर्दयी बापानं 4 मुलांना दुधातून विष पाजलं अन् स्वत:ही प्यायलं, तिघांचा मृत्यू

भोजपुर ज़िला के बिहिया थाना क्षेत्र स्थित बेलवनिया गांव से दिल दहला देने वाली घटना सामने आई है.

Crime News : निर्दयी बापानं 4 मुलांना दुधातून विष पाजलं अन् स्वत:ही प्यायलं, तिघांचा मृत्यू
मामले की जांच में जुटी पुलिस

चार मुलांना दूधातून विष पाजलं आणि त्यानंतर स्वत: विष प्राशन केल्याची मन सुन्न करणारी घटना बिहारमधून समोर आली आहे. या घटनेत दोन मुली आणि एका मुलाचा मृत्यू झाला. तर बाप आणि एका मुलाची मृत्यूशी झुंज सुरु आहे. बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील बिहिया पोलीस स्टेशन परिसरातील ही घटना आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अरविंद कुमार असं मुलांना विष देणाऱ्या वडिलांचे नाव आहे. अरविंदने हे पाऊल उचलले तेव्हा घरातील इतर सदस्य लग्न समारंभाला गेले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद आणि त्याच्या चार मुलांना गंभीर अवस्थेत सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

(नक्की वाचा - Pune Traffic : AI द्वारे सुटणार पुण्याच्या वाहतुकीची समस्या, सरकारचा प्लॅन काय?)

रुग्णालयात त्याच्या दोन मुली नंदिनी कुमारी (12) आणि डॉली कुमारी (5) आणि मुलगा टोनी (6) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अरविंद आणि एका मुलावर रुग्णालयात उपचार अजूनही सुरू आहेत. मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. 

बिहिया पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर भगत यादव यांनी सांगितले की, विष सेवन केल्याने तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. परंतु अरविंद हे टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कुटुंबातील सदस्यांशी बोलल्यानंतरच काहीतरी स्पष्ट होईल. सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

(नक्की वाचा-  UP News : लग्नानंतर पहिल्याच रात्री नवरा-नवरीसोबत भयंकर घडलं; सकाळी बेडरुममधील दृश्य पाहून सगळेच हादरले)

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितनुसार, अरविंदच्या पत्नीचा वर्षभरापूर्वी छतावरून पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर तो दुःखी आणि शांत राहत होता. या तणावामुळेच त्याने प्रथम तिच्या मुलांना विष दिले आणि नंतर स्वतः विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असा संशय आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.