इंदूरमधील नागरिकांना आता एखाद्याला भिक देताना दहावेळा विचार करावा लागणार आहे. कारण एखाद्याला भिक देणे इंदूरकरांना थेट तुरुंगात पाठवू शकते. कारण रस्त्यावर भिक देणे यापुढे चांगुलपणा नाही तर गुन्हा ठरणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इंदूर शहर स्वच्छ आणि भिकाऱ्यापासून मुक्त करण्याच्या उद्देशाने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. इंदूर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, नवीन वर्षापासून हा नवा नियम सुरू होणार आहे. येथे भिकाऱ्यांना भिक देणाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला जाईल. केंद्र सरकारच्या पायलट प्रोजेक्टअंतर्गत इंदूरला भिकारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने हे आदेश जारी केले आहेत.
(नक्की वाचा- फक्त 20 रुपयात टक्कल दूर करण्याचा उपाय! इतकी गर्दी की रस्ते झाले जाम, पाहा Video)
जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी याबाबत म्हटलं की, "भीक मागण्याविरुद्ध आमची जनजागृती मोहीम या महिन्याच्या अखेरपर्यंत (डिसेंबर) शहरात चालणार आहे. जर 1 जानेवारीपासून कोणी भिक देताना आढळून आले, तर त्याच्याविरुद्ध एफआयआरही नोंदवला जाईल. मी इंदूरमधील सर्व रहिवाशांना आवाहन करतो की, ते लोकांना भिक देऊन पापाचे साथीदार बनू नये."
( नक्की वाचा : 100 वर्षांचा नवरा, 102 वर्षांची नवरी, 9 वर्षांची लव्हस्टोरी! जगावेगळ्या लग्नाचा वर्ल्ड रेकॉर्ड )
शहरे भिकारीमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारकडून पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे. देशातील 10 शहरांमध्ये ही मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इंदूर, लखनौ, मुंबई, नागपूर, पाटणा आणि अहमदाबाद सारख्या मोठ्या शहरांचा समावेश आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world