जाहिरात

Vande Bharat 3.0: वंदे भारतचं नवं मॉडेल होणार लाँच! दिल्ली ते मुंबई मार्ग, ट्रायल, वैशिष्ट्यासह वाचा सर्व काही

Vande Bharat Train:भारतीय रेल्वे आता वंदे भारत कार्गो (Freight) ट्रेन लाँच करत आहे. ताशी 160 किमी वेग आणि 264 टन क्षमता असलेली ही ट्रेन दिल्ली-मुंबई मार्गावर चालवली जाऊ शकते. जाणून घ्या या हाय-स्पीड मालगाडीची वैशिष्ट्ये आणि चाचणीबद्दल सविस्तर माहिती.

Vande Bharat 3.0: वंदे भारतचं नवं मॉडेल होणार लाँच! दिल्ली ते मुंबई मार्ग, ट्रायल, वैशिष्ट्यासह वाचा सर्व काही
"First Vande Bharat Freight Train: वंदे भारतचं नवी मॉडेल लाँच होणार"

Vande Bharat Train: वंदे भारत एक्सप्रेस आणि वंदे भारत स्लीपरनंतर आता आणखी एक 'वंदे भारत' ट्रेन धावणार आहे. आता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मालाची जलद गतीने वाहतूक करण्यासाठी वंदे भारत कार्गो (मालवाहू) ट्रेन चालवली जाणार आहे आणि याचं नवीन मॉडेल तयार झाले आहे. पहिल्या वंदे भारत कार्गो ट्रेनची चाचणी याच आठवड्यात नियोजित आहे. रिपोर्टनुसार ही ट्रेन 264 टन, वजन 160 किमी प्रति तास वेगाने वाहून नेण्यास सक्षम असेल. दिल्ली-एनसीआर ते मुंबई यासारख्या व्यस्त मार्गावर याची सुरुवात होण्याची शक्यता आहे.

वंदे भारत फ्रेट (कार्गो) ट्रेनची वैशिष्ट्ये | Vande Bharat Cargo Train

  1. जास्तीत जास्त वेग: 160 किमी/तास
  2. क्षमता: 264 टन
  3. कोच: 16 डब्यांची रॅक
  4. पॉवर: 50% (ईएमयू कॉन्फिगरेशन)
  5. दरवाजे: 1800 मिमी स्वयंचलित प्लग डोअर्स
  6. मालवाहतूक: पॅलेटाइज्ड कंटेनर्स, ज्यामध्ये तापमान नियंत्रित (रीफर) युनिट्सचा समावेश आहे.
  7. निर्माता: आयसीएफ (ICF) चेन्नई
  8. चाचणी: आरडीएसओ (RDSO) लखनौ

वंदे भारत - सुपरफास्ट स्पीड मालवाहतूक

भारतीय रेल्वे वंदे भारत फ्रेट ट्रेन लाँच करण्यासाठी मालवाहतुकीशी संबंधित प्रणालीचे आधुनिकीकरण करत आहे. चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये (ICF) याचा पहिला प्रोटोटाइप (नमुना) तयार झाला आहे. रेल्वेची संशोधन शाखा RDSO सुरक्षा आणि इतर निकषांवर याची चाचणी घेणार आहे. 'फायनान्शिअल एक्सप्रेस'च्या वृत्तानुसार, भारतीय रेल्वेला वंदे भारत मालगाडीच्या माध्यमातून मालाची वाहतूक जलद करायची आहे, जेणेकरून कमी खर्चात सामान एका बाजारपेठेतून दुसऱ्या बाजारपेठेत पोहोचवता येईल. यामुळे लवकर खराब होणाऱ्या वस्तूंची नासाडी थांबण्यास मदत होईल.

वंदे भारत ट्रेनचं प्रोटोटाइप

वंदे भारत कार्गोचं प्रोटोटाइप आयसीएफ चेन्नईने तयार केला आहे. ही ट्रेन पूर्णपणे कार्यान्वित होण्यापूर्वी तिचा वेग, आपत्कालीन ब्रेकिंग सिस्टम आणि लोडिंग क्षमता यांचे मूल्यमापन केले जाईल. चाचणीदरम्यान या हाय-स्पीड ट्रेनची सुरक्षा आणि कार्यक्षमतेची कसून तपासणी केली जाणार आहे.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

भारतीय रेल्वेचा नवा ब्रँड | Vande Bharat Cargo Train News 

वंदे भारत ट्रेन आता भारतीय रेल्वेचा एक नवा ब्रँड म्हणून उदयास आली आहे. सध्या देशभरात 164 मार्गांवर वंदे भारत ट्रेन धावत आहेत, ज्या प्रवाशांना हाय-स्पीड कनेक्टिव्हिटीसह सुरक्षा आणि लक्झरी सुविधा देत आहेत. भारताची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन बंगळुरू आणि हैदराबाद शहरादरम्यान सुरू झाली आहे, जी सुमारे 610 किमी अंतर पार करते. 160 किमी/तास वेगामुळे या ट्रेनने प्रवासाचा वेळ सामान्य गाड्यांच्या तुलनेत दोन ते तीन तासांनी कमी होतो. वंदे भारत स्लीपरमध्ये 'कवच' सुरक्षा प्रणाली, सेन्सर लाइटिंग, आवाज कमी करण्याचे तंत्रज्ञान आणि प्रवाशांच्या आरामासाठी अर्गोनॉमिक कुशनिंग दिले आहे. यात फर्स्ट क्लास एसी, सेकंड एसी आणि थर्ड एसी कोचचा समावेश आहे.

(नक्की वाचा: Pune News: पुणे-सातारा प्रवास महागला; खेड शिवापूर टोल नाक्यावर 1 एप्रिलपासून दरवाढ लागू'; नवीन नियम वाचा)

वंदे भारत एक्सप्रेस आणि आता पुन्हा वंदे भारत स्लीपर 

  1. पहिली वंदे भारत एक्सप्रेस: 15 फेब्रुवारी 2019 (नवी दिल्ली-कानपूर-प्रयागराज-वाराणसी मार्ग).
  2. दुसरी आवृत्ती: सप्टेंबर 2022 मध्ये लाँच (वजन कमी, जास्त वेग आणि कमी इंधन खर्च).
  3. स्लीपर आवृत्ती: फेब्रुवारीमध्ये वंदे भारत 2.0 स्लीपर लाँच करण्यात आली, ज्यामध्ये ऑनबोर्ड वाय-फाय आणि चार्जिंग पोर्ट्स आहेत.
  4. कार्गो व्हेरिएंट: आता कार्गो व्हेरिएंटची सुरुवात होत असून, यामुळे वाहतूक क्षेत्रात मोठी क्रांती अपेक्षित आहे.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com