- 21 people were killed after a fire broke out in a hotel in Delhi's Malviya Nagar this morning
- Fire broke out around 8:50 am in Flourish Stay's basement restaurant
- About 40 guests were inside, including foreign nationals who were in the country for treatment
दिल्लीतून अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर परिसरातील एका हॉटेलला आज सकाळी अचानक भीषण आग लागली. या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे तब्बल 21 लोकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. तर डझनहून अधिक लोकांना आपत्कालीन यंत्रणांनी सुखरूप बाहेर काढले आहे.
हौझ राणी येथील अत्यंत अरुंद गल्लीत असलेल्या Flourish Inn या हॉटेलमध्ये हा हाहाकार उडाला. हे हॉटेल पाच मजली असून त्यात सुमारे 25 खोल्या आहेत. आग लागली तेव्हा इमारतीमध्ये 40 ते 50 हून अधिक लोक उपस्थित होते आणि त्यातील बहुतांश जण गाढ झोपेत होते.

Photo Credit: PTI
जीव वाचवण्यासाठी लोकांच्या उड्या!
सकाळी साधारण 8.50 वाजता अग्निशमन दलाला या आगीचा तातडीचा कॉल मिळाला. आग एवढी वेगाने पसरली की लोकांना बाहेर पडण्यास मार्ग उरला नाही. सोशल मीडियावर समोर आलेल्या काही व्हिडिओंमध्ये, इमारतीला लागलेल्या भीषण आगीतून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काही लोक थेट खिडक्यांमधून जमिनीवर उड्या मारताना दिसत आहेत. घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन दलाच्या गाड्या, पाण्याचे टँकर्स, क्युआरव्ही आणि इतर बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले.
(नक्की वाचा- Hero MotoCorp New Bike: हिरो मोटोकॉर्पचा मोठा धमाका! पेट्रोल किंवा चार्जिंगशिवाय धावणार बाईक)
#Watch | Woman jumps to safety as fire engulfs in Delhi's Malviya Nagar pic.twitter.com/zdtys4r8fV
— NDTV (@ndtv) June 3, 2026

Photo Credit: PTI
परदेशी नागरिकांचाही समावेश
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या हॉटेलमध्ये प्रामुख्याने परदेशी नागरिक वास्तव्यास होते. जे दिल्लीतील विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी भारतात आले होते. आग लागली तेव्हा बहुतांश रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक झोपलेले होते. आगीत होरपळून मरण पावलेले बहुतांश लोक हे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचे नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे.
#WATCH | Delhi | Death toll rises to 10 in Malviya Nagar restaurant fire incident, say Delhi Police.
— ANI (@ANI) June 3, 2026
Visuals from the site pic.twitter.com/sfrzsMzJIm
इलेक्ट्रिक शेगडीचा पेट
हॉटेलच्या बेसमेंटमध्ये असलेल्या रेस्टॉरंटचे मुख्य शेफ केसर सिंग यांनी सांगितलं की, "सकाळी साधारण आठ वाजेच्या सुमारास मी रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरात गेलो आणि तिथला इलेक्ट्रिक शेगडी सुरू करण्याचा प्रयत्न केला. मी बटण दाबताच अचानक आगीच्या मोठ्या ज्वाला भडकल्या. मला काही वेळातच समजले की आग केवळ स्वयंपाकघरात नाही, तर हॉटेलमध्ये आधीपासूनच पसरली होती. मी ताबडतोब माझ्या सहाय्यकाला सावध केले. मी जेव्हा कसातरी हॉटेलच्या बाहेर आलो, तेव्हा संपूर्ण इमारत आगीच्या विळख्यात अडकली होती."
(नक्की वाचा- Vaibhav Sooryavanshi: वैभवसमोर मोठा पेच; अलिशान कार जिंकली, पण एक खंत सतत सतावेल!)

The loss of lives due to a fire incident in Malviya Nagar, Delhi is tragic. My condolences to those who have lost their loved ones. Wishing a speedy recovery to the injured. Authorities are providing all possible assistance to those affected.
— PMO India (@PMOIndia) June 3, 2026
An ex-gratia of Rs. 2 lakh from…
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याकडून शोक
या भीषण दुर्घटनेची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतकांच्या नातेवाईकांसाठी त्यांनी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. "हॉटेलमधील आगीच्या दुर्घटनेत झालेली जीवितहानी अत्यंत दुःखद आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांप्रती माझ्या संवेदना. जखमी लोक लवकर बरे व्हावेत, हीच प्रार्थना. स्थानिक प्रशासन बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे," अशी पोस्ट पंतप्रधान कार्यालयाने 'X' वर केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world