जाहिरात

Manmohan Singh Death: अर्थव्यवस्थेचा कोहिनूर कालवश! डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर

देशाच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, विनम्र आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व असलेल्या मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे. 

Manmohan Singh Death: अर्थव्यवस्थेचा कोहिनूर कालवश! डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर

दिल्ली: देशाच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया घालणारे, थोर अर्थशास्त्री आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशाच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, विनम्र आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व असलेल्या मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे. 

डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर  सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले असून देशभरात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. आज सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्यात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशासाठी दिलेल्या योगदानासाठी आदरांजली वाहण्यात येणार आहे. डॉ.मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर पूर्ण सरकारी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

देशाच्या राजकारणातील अनेक महत्त्वाची पदे भूषवताना डॉ. मनमोहन सिंग यांनी आपल्या कार्याची छाप पाडली. देशाचे पंतप्रधान, अर्थमंत्री यासोबत केंद्रीय अर्थमंत्रालयातील सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार तसंच युजीसीचे अध्यक्ष या पदांवरही त्यांनी काम केलं आहे. 

2004 मध्ये देशात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर मनमोहन सिंग हे पंतप्रधान झाले. आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांनी  राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन, आधार कार्डची अंमलबजावणी, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, माहितीचा अधिकार यासारखे महत्त्वाचे निर्णय घेतले.  डॉ. मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठातून  प्राथमिक शिक्षण घेतले. येथून त्यांनी 1952 मध्ये अर्थशास्त्रात पदवी घेतली होती. 1954 मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड कॉलेजमधून डॉ. फिलची पदवीही मिळवली.

 नक्की वाचा : (भारतीय अर्थव्यवस्थेला संजीवनी देणारे महर्षी हरपले, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन )

Listen to the latest songs, only on JioSaavn.com