जाहिरात

Dewas Fire: आई, वडील अन् दोन मुलं, गाढ झोपेत असतानाच काळाचा घाला; चौघांचाही मृत्यू

MP Fire News: शुक्रवारी रात्री उशिरा सोलंकी यांच्या घराला भीषण आग लागली. या अपघातात गुदमरून चार जणांचा मृत्यू झाला

Dewas Fire: आई, वडील अन् दोन मुलं, गाढ झोपेत असतानाच काळाचा घाला; चौघांचाही मृत्यू

 मध्यप्रदेश: तळमजल्यावर असलेल्या डेअरीला लागलेली आग घरामध्ये पोहोचल्याने होरपळून आई- वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशातील देवास शहरात ही घटना घडली. दिनेश  (35 वर्ष), गायत्री (30 वर्ष), इशिका (10 वर्ष) आणि चिराग (7 वर्ष) अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवास शहरातील नयापुरा भागात मदन सोलंकी यांचे घर आहे.  शुक्रवारी रात्री उशिरा सोलंकी यांच्या घराला भीषण आग लागली. या अपघातात गुदमरून चार जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली. दिनेश (35 वर्ष), गायत्री (30 वर्ष), इशिका (10 वर्ष) आणि चिराग (7 वर्ष) यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दिनेश स्वतःची डेअरी चालवायचा. ज्याचे काम त्यांनी घराच्या खाली तळमजल्यावर केला होता. ते आपल्या कुटुंबासह वरच्या मजल्यावर राहत होता. अपघाताची नेमकी कारणे समजू शकलेली नाहीत. तळमजल्यावर बांधलेल्या डेअरीला आग लागली आणि हळूहळू एवढा वाढत जाऊन उग्ररुप  धारण केल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे.

घराच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या दुधाच्या डेअरीला आग लागली,  काही वेळातच आगीने उग्र रूप धारण करून दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचली. मृत कुटुंब डेअरीच्या दुसऱ्या मजल्यावर राहत होते. कुटुंबात पती, पत्नी आणि त्यांची दोन मुले होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. त्याचबरोबर पोलिसांनी मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

(नक्की वाचा-  Success story: आधी नापास झाला मग यशाचा मानकरी ठरला! शेतकऱ्याच्या लेकानं काय केलं?)

दरम्यान, दिनेश सुतारकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. हे कुटुंब देवासच्या नयापुरा भागात बऱ्याच दिवसांपासून राहत होते. रात्री डेअरीला आग लागल्याचे आणि संपूर्ण घर जळून खाक झाल्याचे शेजाऱ्यांनी पाहिले. त्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अनेक तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या, ज्यानंतर आग आटोक्यात आणली गेली. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: