
सोन्याच्या दराने मंगळवारी संध्याकाळी (Gold Rate on 22 July 2025) नवा उच्चांक प्रस्थापित केला. सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातील तेजी कायम असल्याचे पाहायला मिळते आहे. ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्या-चांदीचे दर खालीलप्रमाणे आहेत.
आज सोन्याचा विक्री दर काय आहे?
- स्टँडर्ड 99.5 सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,00,000 रुपये इतका आहे.
- 22 कॅरेट 916 सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 93,000 रुपये नोंदवला गेला आहे.
- 18 कॅरेट 750 सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 78,000 रुपये आहे.
- 14 कॅरेट 583 सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 65,000 रुपयांवर पोहोचला आहे.
( नक्की वाचा: मुंबईत घर, 12 कोटी पोटगी आणि BMW कार; पत्नीच्या मागण्या ऐकून सगळेच अवाक )
सोन्याचा खरेदी दर
- स्टँडर्ड 99.5 सोन्यासाठी खरेदी दर प्रति 10 ग्रॅम 99,000 रुपये
- 22 कॅरेट 916 सोन्याचा खरेदी दर प्रति 10 ग्रॅम 91,000 रुपये.
- 18 कॅरेट 750 सोन्यासाठी खरेदी दर प्रति 10 ग्रॅम 76,000 रुपये.
- 14 कॅरेट 583 सोन्याचा खरेदी दर प्रति 10 ग्रॅम 63,000 रुपये इतका.
( नक्की वाचा: Videocon ला 300 कोटींचे कर्ज देण्यासाठी 64 कोटींची लाच घेतली, चंदा कोचर दोषी )
चांदीचा आजचा भाव काय आहे?
- प्रति किलो चांदीचा विक्री दर 1,15,900 रुपये इतका नोंदवला गेला आहे.
ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी NDTV मराठीशी बोलताना म्हटले की, "जागतिक पातळीवर सोन्याचे दर वाढल्याने भारतातही सोन्याचे दर वाढले आहेत. भारतात प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 1 लाख रुपये झाला आहे, सोबतच चांदीचेही दर वाढलेले आहेत. चांदीचे दर यापुढे वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत सोन्याचे दर एक लाख 5 हजार ते एक लाख 15 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतात."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world