जाहिरात
This Article is From Mar 19, 2024

Google Map चूक आहे! रस्ता चुकू नये या स्थानिकांनी लावला बोर्ड

सर्व जगाला हवं ते शोधून देणाऱ्या गूगलची चूक दाखवणारा बोर्ड या स्थानिकांनी लावला आहे.

Google Map चूक आहे! रस्ता चुकू नये या स्थानिकांनी लावला बोर्ड
'या' गावकऱ्यांनी गूगलची चूक शोधली आहे.
मुंबई:

Google Maps Issue Viral Photo: अनोळखी लोकेशनवर पोहचण्यासाठी आपण सर्रास गुगल मॅप वापरतो. रस्ता दाखवण्याबरोबरच ट्रॅफिक अपडेटसाठीही गुगल मॅप्सची मदत घेतली जाते. पण, अनेकदा गुगल मॅप्सवर डोळे झाकून विश्वास ठेवणं तुमच्यासाठी अडचणीचं ठरु शकतं. अनेकदा तांत्रिक गडबडीमुळे तुम्ही चुकीच्या ठिकाणीही पोहचलेला आहात. काही जणांनी यावर एक सॉलिड उपाय शोधलाय. या उपायाची सध्या इंटरनेटवर चर्चा सुरु आहे. 


गुगलनं सांगितला चुकीचा रस्ता (Google Maps Wrong Directions)

कर्नाटकातील कोडगू जिल्ह्यातील स्थानिक मंडळींनी गुगल मॅपनं चुकीचा रस्ता दाखवण्याच्या प्रश्नावर मजेदार साईनबोर्ड लावलाय. हा साईनबोर्ड सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झालाय. गुगल नेव्हिगेशनच्या चुकीबाबत इशारा देणारा बोर्ड कोडगूमधील स्थानिकांनी लावला आहे. त्याच्या मदतीनं कल्ब महिंद्रा रिसॉर्टपर्यंत जाण्याचा योग्य रस्ता प्रवशांना मिळतो. 'गुगल चुकीचं आहे. हा रस्ता क्लब महिंद्रापर्यंत जात नाही,' असं या बोर्डवर लिहिलं आहे. 

लोकांनी काढला गुगलवर राग (Google Is Wrong)

@KodaguConnect या अकाऊंटवरून हा फोटो सोशल मीडिया साईट (X) वर शेअर करण्यात आलाय. 'गुगल सॅटेलाईट लोकेशनमधील गोंधळामुळे अनेक जण गुगल मॅपचा वापर करुन इथं पोहचतात. अनेक प्रवासी रस्ता चुकतात. त्यानंतर ते स्थानिकांना रस्ता विचारतात. या त्रासामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांनी लोकांना योग्य रस्ता दाखवण्यासाठी स्थानिकांनी ही युक्ती शोधलीय.'

गुगलची चूक दाखवणारा हा बोर्ड सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. त्यावर युझर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'हिल स्टेशनवर फिरताना गुगल मॅपवर विश्वास ठेवू शकत नाही,' असं एका युझरनं म्हंटलंय. आणखी एका युझरनंही याबाबत स्वत:चा अनुभव शेअर केलाय. 'गुगल मॅप नेहमी अचूक नसतो. मागच्या आठवड्यात माझी बहीण सकलेशपुराला गेली होती. तिनं गुगल मॅप्स फॉलो केला. त्यामुळे तिला रस्ता सापडला नाही. खराब रस्त्यावर तिची कार अडकली,' असं त्यानं सांगितलं. 
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com