मित्राच्या मैत्रिणीने केले ढिचक्यॅव!! बायकोला भेटण्यावरून भांडण, वाढदिवशी मोठा राडा

अंशिका वाढदिवस साजरा करत असतेवेळी, विशाल मिश्रा हा त्याच्या तीन मित्रांसह तिथे आला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
गोरखपूर:

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये रस्त्याच्या कडेला वाढदिवस साजरा करत असताना एका महिलेने केलेल्या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. किरकोळ वादातून सुरू झालेल्या भांडणाचे रूपांतर गोळीबारात झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी महिलेसह तिच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी रात्री कॅंट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंघारिया परिसरात घडली. आरोपी महिला अंशिका (रा. हरपूर बुधट) ही आपल्या मित्रांसोबत कारने आली होती आणि रस्त्याच्या कडेला वाढदिवस साजरा करत होती.

नक्की वाचा: Sunjay Kapur Property Case: मालमत्तेसाठी मुलाला फसवले! संजय कपूर यांच्या आईचा सुनेवर गंभीर आरोप

मैत्रीण बायकोला भेटत असल्याने वादाला सुरूवात

अंशिका वाढदिवस साजरा करत असतेवेळी, विशाल मिश्रा हा त्याच्या तीन मित्रांसह तिथे आला होता. विशाल आणि अंशिका एकमेकांना ओळखत असून विशालला संशय होता की, अंशिका ही त्याच्या पत्नीला वारंवार भेटते. याच मुद्द्यावरून त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. भांडण सुरू असतानाच अंशिकाने आपल्याकडे असलेली पिस्तूल बाहेर काढली. अंशिकाने बंदूक बाहेर काढल्याचे पाहून तिच्या मित्रांनी ती तिच्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, यावेळी झालेल्या झटापटीत अंशिकाच्या बंदुकीतून गोळी झाडली गेली, ही गोळी विशालचा मित्र अमिताभ निषादवर झाडली गेली. पोटात गोळी लागल्याने जखमी झालेल्या अमिताभला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले.

नक्की वाचा: LIC इमारतीतील 'ती' आग 'अपघात' नव्हे 'हत्या'! महिला मॅनेजरला सहकाऱ्यानेच जिवंत जाळले; धक्कादायक खुलासा

अंशिकाचा पाठलाग करून पकडले

गोळीबाराच्या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी हिंमत दाखवत अंशिका आणि तिच्या दोन साथीदारांचा पाठलाग केला आणि त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तूल जप्त केली आहे. तपासादरम्यान पोलिसांना कळाले की अंशिका ही बदमाश असून तिच्यावकर यापूर्वी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासत असून, याआधारे पुढील तपास केला जातोय.  

Topics mentioned in this article