
LPG Gas Cylinder Price: सर्वसामान्यांसाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कावर दोन रुपयांची वाढ केल्यानंतर सर्वसामान्यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. केंद्र सरकारकडून एलपीजी गॅसच्या किमतीतही 50 रुपयांची वाढ केली आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबतची घोषणा केली आहे. एलपीजी गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किमती आज रात्री 12 वाजल्यापासून लागू होतील.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, 8 एप्रिल 2025 पासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात येत आहे. ही वाढ सर्व ग्राहकांना म्हणजेच उज्ज्वला योजना आणि उज्ज्वला नसलेल्या ग्राहकांना लागू असेल. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत (PMUY) गरीब महिलांना स्वच्छ स्वयंपाक इंधन म्हणजेच LPG मिळावे म्हणून त्यांना मोफत गॅस कनेक्शन दिले जातात. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील गरीब महिलांना दिला जातो. आता, नवीन किमतींनुसार, उज्ज्वला योजना आणि इतर ग्राहकांना गॅस सिलिंडरसाठी 50 रुपये जास्त द्यावे लागतील.
#WATCH | Delhi | Union Minister for Petroleum and Natural Gas, Hardeep Singh Puri says, "The price per cylinder of LPG will increase by Rs 50. From 500, it will go up to 550 (for PMUY beneficiaries) and for others it will go up from Rs 803 to Rs 853. This is a step which we will… pic.twitter.com/KLdZNujIwK
— ANI (@ANI) April 7, 2025
दरम्यान, एका वर्षानंतर घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल झाला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत शेवटचा बदल 9 मार्च 2024 रोजी दिसून आला. त्यानंतर सरकारने गॅस सिलिंडरची किंमत 100रुपयांनी कमी केली होती. त्याआधी 30 ऑगस्ट 2023 रोजी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 200 रुपयांनी कमी करण्यात आली होती. त्यानंतर घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1103 रुपयांवरून 903 रुपयांवर आली होती.
तत्पुर्वी, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत, त्यामुळे सरकारने भारत पेट्रोलियम, रिलायन्स आणि हिंदुस्तान पेट्रोलियम सारख्या पेट्रोलियम कंपन्यांवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली आहे. आता हे पाहायचे आहे की देशातील तेल कंपनीने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत की सध्याच्या दराने लोकांना पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरू ठेवला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world