
प्रसाद शिंदे, अहिल्यानगर
Ahilyanagar News : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. कर्जत नगरपंचायतमध्ये आमदार रोहित पवारांचे समर्थक नगराध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. नगरपंचायतीतील 17 पैकी 13 नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. कर्जत नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 12, भाजपचे 2 आणि काँग्रेसचे 3 नगरसेवक आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कर्जत नगरपंचायतमध्ये रोहित पवार समर्थक उषा राऊत या नगराध्यक्ष आहेत. नगरसेवकांना विचारात न घेता कामकाज करत असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहेृ. अडीच वर्षांनंतर नगराध्यक्ष बदलण्याचे ठरले असताना राजीनामा न दिल्याने अविश्वास ठराव आणण्यात आला आहे. नागरी सुविधा देण्याची मागणी केल्यास टाळाटाळ करत असल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.
(नक्की वाचा- Gold Rates : सोन्याची किंमत 57 हजारांवर येणार? गुंतवणूकदारांची होणार चांदी, काय आहे कारण?)
कर्जत नगरपंचायतीवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सत्ता असून नगराध्यक्ष उषा अक्षय राऊत या आहेत. परंतु गेल्या तीन वर्षापासून त्या कोणालाही विचारात न घेता मनमानीने कामकाज करत आहेत. शासनाच्या नियमांचे पालन न करता कामकाज केले जात असून जनतेच्या आवश्यक असलेल्या आरोग्य, शिक्षण, सांडपाणी यासह अनेक सुविधा पूर्ण होऊ न शकल्याने नागरिकांची नाराजी देखील नगरसेवकांवर निर्माण झाली आहे.
त्यामुळे नगराध्यक्षा उषा राऊत मनमानी कारभारामुळे नगरसेवकांना जनतेच्या रोशाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणला असून आज तो अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
(नक्की वाचा- शेअर बाजार धडाम, गुंतवणूकदारांनी 17 लाख कोटी गमावले; घसरणीची 5 कारणे)
अविश्वासाचा ठराव दाखल झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनी पुन्हा एकदा धक्का दिल्याची चर्चा रंगू लागली आहे. कोंबळी एमआयडीसीवरून देखील दोघांमध्ये कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळाला होता. त्यानंतर भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर सभापती राम शिंदे यांनी कोंबडी येथे नव्याने एमआयडीसी मंजूर करून आणली त्यावेळी देखील सभापती राम शिंदे यांनी एमआयडीसीच्या मुद्द्यावर आमदार रोहित पवार यांच्यावर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं होतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world