UP News: होणाऱ्या बायकोसोबत घाणेरडं कृत्य, VIDEO बनवून केलं ब्लॅकमेल; नवरदेवासह कुटुंबावर FIR

UP News: ग्नाची तारीख 8 फेब्रुवारी 2026 निश्चित करण्यात आली होती. मात्र, साखरपुड्यानंतर उत्कर्षने मुलीशी जवळीक वाढवली आणि व्हिडिओ कॉल दरम्यान तिला फसवून तिचे काही खाजगी आणि अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले.

जाहिरात
Read Time: 2 mins

Uttar Pradesh News: होणाऱ्या बायकोसोबत घाणेरडं कृत्य, VIDEO बनवून केलं ब्लॅकमेल; नवरदेवासह कुटुंबावर लग्नाचे आमिष दाखवून किंवा नातेसंबंधांचा गैरफायदा घेऊन ब्लॅकमेलिंग करण्याच्या घटना वाढत आहेत. कौशाम्बी जिल्ह्यातील मंझनपुर कोतवाली परिसरात अशाच एका घटनेने खळबळ उडाली आहे. प्रयागराज येथील उत्कर्ष अग्रवाल नावाच्या तरुणाने आपल्या होणाऱ्या बायकोला अश्लील व्हिडिओच्या जोरावर ब्लॅकमेल करत 1 कोटी रुपयांच्या हुंड्याची मागणी केली आहे. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी उत्कर्षसह त्याच्या आई, वडील आणि बहिणीवर गुन्हा दाखल केला आहे.

नेमकी घटना काय?

मंझनपुर येथील रहिवासी असलेल्या तक्रारदाराने आपली मुलगी आणि उत्कर्ष अग्रवाल यांचा साखरपुडा 9 जून 2025 रोजी झाला होता. साखरपुड्याच्या वेळी वडिलांनी 5 लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने भेट म्हणून दिले होते. लग्नाची तारीख 8 फेब्रुवारी 2026 निश्चित करण्यात आली होती. मात्र, साखरपुड्यानंतर उत्कर्षने मुलीशी जवळीक वाढवली आणि व्हिडिओ कॉल दरम्यान तिला फसवून तिचे काही खाजगी आणि अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले.

(नक्की वाचा-  Kolhapur Robbery: कोल्हापुरात धावत्या बसवर दरोडा! 60 किलो चांदी, सोनं, रोख पैशांसह कोट्यवधी लुटले)

1 कोटींची मागणी आणि धमकी

काही दिवसांनंतर उत्कर्षने आपला रंग दाखवण्यास सुरुवात केली. त्याने पीडितेच्या वडिलांना फोन करून सांगितले की, "जर लग्न करायचे असेल, तर हुंड्यात 1 कोटी रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुझे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तुला बदनाम करेन."पीडितेच्या वडिलांनी जेव्हा समजावण्याचा प्रयत्न केला की "लग्नाचे बजेट 25 लाख रुपये ठरले होते. मग आता 1 कोटी कोठून आणणार? तेव्हा उत्कर्षच्या वडिलांनी आणि बहिणीनेही फोन करून शिवीगाळ करत मुलीला बदनाम करण्याची धमकी दिली.

(नक्की वाचा-  पुणे-मुंबई महामार्गावरील सोमटणे फाटा, वरसोली टोलनाके बंद पाडणार; आमदार सुनील शेळकेंचा इशारा)

पोलिसांची कारवाई

अखेर मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून उत्कर्ष अग्रवाल (नवरा), शोभित अग्रवाल (वडील), शिप्रा अग्रवाल (आई), नियति अग्रवाल (बहीण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

Topics mentioned in this article