जाहिरात

GST on Gold: ​सोन्यावर किती जीएसटी लागणार? 1 लाखांच्या सोन्यावर किती कर?

GST on Gold: जीएसटी बैठकीत 12% आणि 28% चे जीएसटी स्लॅब रद्द करण्यात आले असून, आता फक्त 5% आणि 18% असे दोनच स्लॅब लागू असतील. यामुळे अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत.

GST on Gold: ​सोन्यावर किती जीएसटी लागणार? 1 लाखांच्या सोन्यावर किती कर?
  • जीएसटी परिषद ने सोने और चांदी पर तीन प्रतिशत जीएसटी दर को अपरिवर्तित रखने का निर्णय लिया है.
  • जीएसटी स्लैब में बदलाव करते हुए चार स्लैब हटाकर केवल पांच प्रतिशत और अठारह प्रतिशत स्लैब लागू किए जाएंगे.
  • पराठे पर जीएसटी दर को अठारह प्रतिशत से घटाकर शून्य प्रतिशत करने का फैसला किया गया है.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

GST Council : जीएसटी परिषदेच्या बैठकीत अनेक मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सोन्या-चांदीवरील जीएसटी दर मात्र कायम ठेवण्यात आला असून, तो 3% असेल. तसेच, अनेक रोजच्या वापरातील वस्तू, खाद्यपदार्थ आणि वाहनांवरचा जीएसटी कमी करून सामान्य नागरिकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. 

या निर्णयाला ‘जीएसटी 2.0' सुधारणा असे नाव देण्यात आले आहे, ज्याचा उद्देश करप्रणाली अधिक सोपी आणि सुटसुटीत बनवणे आहे. या बैठकीत 12% आणि 28% चे जीएसटी स्लॅब रद्द करण्यात आले असून, आता फक्त 5% आणि 18% असे दोनच स्लॅब लागू असतील. यामुळे अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत.

(नक्की वाचा-  GST Rate Cut: सर्वसामन्यांना मोठा दिलासा! जीएसटी कर बदलांमुळे 'या' वस्तू होणार स्वस्त, वाचा यादी)

सोने, चांदी आणि दागिने

जीएसटी परिषदेने सोन्या-चांदीच्या दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. सोन्या-चांदीवर 3% जीएसटी कायम राहील. तसेच, दागिने बनवण्यासाठी लागणाऱ्या मजुरीवर 5% जीएसटी लागू असेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही 1 लाख रुपयांचे सोने किंवा चांदी खरेदी केली, तर तुम्हाला त्यावर सुमारे 3,000 रुपये जीएसटी भरावा लागेल.

काय स्वस्त झालं?

बटर, तूप, पनीर, सुकामेवा, अंजीर, खजूर, एवोकॅडो, मांस, जाम आणि जेली, नमकीन, 20 लीटरच्या बाटलीत पॅक केलेले पिण्याचे पाणी, फळांचा रस, दूध, आईस्क्रीम, बिस्किटे, कॉर्न फ्लेक्स आणि साखर-आधारित मिठाई अशा अनेक वस्तूंवरील कर 12% किंवा 18% वरून 5% पर्यंत कमी केला गेला आहे.

(नक्की वाचा- GST Reforms: : कररचनेत क्रांती! जीएसटीचे 12% आणि 28% चे स्लॅब रद्द, जाणून घ्या तुम्हाला कसा होणार फायदा)

इतर महत्त्वाच्या वस्तू

टूथ पावडर, दुधाच्या बाटल्या, स्वयंपाकघरातील भांडी, छत्री, सायकल, बांबूचे फर्निचर आणि कंगवा यांसारख्या ग्राहकोपयोगी वस्तूंवरील कर 12% वरून 5% पर्यंत कमी करण्यात आला आहे. शॅम्पू, टॅल्कम पावडर, टूथपेस्ट, टूथब्रश, फेस पावडर, साबण आणि हेअर ऑईलवरील कर 18% वरून 5% पर्यंत घटवण्यात आला आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com