
हरियाणातील गुरुग्राममध्ये भीषण अपघातात एका बाईकस्वाराचा मृत्यू झाला आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला धडक बसल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. कार चुकीच्या बाजूने (राँग साईड) ने येत असल्याचा बाईकस्वाराला अंदाज आला नाही. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन कार चालकाला ताब्यात घेतलं आहे. या अपघाताच्या घटनेचा धडकी भरवणारा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अक्षत गर्ग असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून तो द्वारका येथील पोचनपूर येथील रहिवासी होता. अक्षत आपल्या बाईकने वेगाने जात होता. मात्र अचानक समोर आलेल्या कारला त्याची बाईक धडकली. अपघाताच्या वेळी अक्षत गर्गचे मित्रही दुचाकीवर मागे होते. त्यांनी अक्षत गर्गचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला.
(नक्की वाचा - 'सिल्लोड आहे की पाकिस्तान , इथं राहायचं की...' दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य, वाद पेटणार?)
Gurugram, Haryana: A 23-year-old motorcyclist, Akshat Garg, was killed in a wrong-way collision on Golf Course Road, DLF Phase II. The crash, captured on a GoPro by his friend, occurred around 5: 45 AM. Despite wearing safety gear, Garg succumbed to the impact. Authorities are… pic.twitter.com/ih29byhfzt
— IANS (@ians_india) September 19, 2024
कुलदीप कुमार ठाकूर असे आरोपी कार चालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुलदीप कुमार ठाकूर हा घिटोरणी येथील रहिवासी असून तो एका पीआर कंपनीचा सहसंस्थापक आहे. कुलदीप ठाकूर हा अनेकदा चुकीच्या बाजूने वाहन चालवत रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचे देखील समोर आले आहे. त्याचे अनेक वेळा वाहतूक विभागाने दंड देखील बजावला आहे.
(नक्की वाचा - मोठा आवाज, लाल रंगाचा प्रकाश... आकाशातून पडलेल्या उपकरणाची येवला परिसरात चर्चा)
गेल्या महिन्यातच आरोपीचं चलान जारी करण्यात आले. मात्र या कार चालकाला कोणाचीच भीती नसल्याने त्याने पुन्हा एकदा चुकीच्या बाजूने गाडी चालवली. दुदैवाने समोरुन वेगाने येणाऱ्या बाईकस्वाराने या कारला धडक दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून कार चालकाला ताब्यात घेतले. मात्र, नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. या अपघाताचा एक व्हिडीओही समोर आला आहे, जो खूप व्हायरल होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world