जाहिरात

Haryana Election Results : राजकारणाच्या आखाड्यात विनेश फोगाट विजयी, भाजप उमेदवाराला केलं चित-पट

Vinesh Phogat Win : अवघ्या 32 दिवसांपूर्वी विनेशने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आणि जुलाना विधानसभा (Haryana Election Results) मतदारसंघातून निवडणूक लढवली अन् विजयीही झाली. 

Haryana Election Results : राजकारणाच्या आखाड्यात विनेश फोगाट विजयी, भाजप उमेदवाराला केलं चित-पट
नवी दिल्ली:

ऑलिम्पिकमध्ये हुकलेल्या पराभवानंतर संपूर्ण देश कुस्तीपटू विनेश फोगाटच्या (Wrestler Vinesh Phogat) बाजूने उभा राहिला होता. हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीतही जुलाना मतदारसंघातील जनता विनेशच्या पाठिशी उभी राहिल्याचं दिसून येत आहे. अवघ्या 32 दिवसांपूर्वी विनेशने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आणि जुलाना विधानसभा (Haryana Election Results) मतदारसंघातून निवडणूक लढवली अन् विजयीही झाली. 

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, सहाव्या टप्प्यापर्यंत विनेश फोगाट पिछाडीवर होती. तर सातव्या टप्प्यात भाजपचे उमेदवार योगेश बैरागी यांना मागे टाकत विनेश फोगाट पहिल्या क्रमांकावर पोहोचली आणि शेवटी विजयी झाली. विनेश फोगाटला 65,080 मतं मिळाली असून ती 6015 मतांनी जिंकली आहे. योगेश बैरागी यांना 59,065 मतं मिळाली आहेत. याशिवाय सुरेंद्र लाठर यांना 10,158 मंत मिळाली. त्यानुसार विनेश फोगाटने 6015 मतांनी विजयी झाले आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: