
दिल्ली-एनसीआरमध्ये वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. मान्सून येण्यापूर्वीच दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, गाजियाबादसह एनसीआरमधील अन्य भागांमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा नागरिकांना सहन करावा लागत आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे दिल्लीमध्ये आल्हाददायक वातावरण तयार झाले असले तरी नागरिकांना दैनंदिन कामासाठी त्रास सहन करावा लागत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दिल्लीतील अनेक ठिकाणांवर गुडघ्यापर्यंत पाणी साचलं आहे. हवामान विभागाकडूनही दिल्लीकरांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. दिल्ली-एनसीआरमधील भागात शनिवारी भीषण उकाड्याचा त्रास दिल्लीकरांना सहन करावा लागला होता. दरम्यान रात्री अचानक पावासाचा जोर वाढला. दिल्लीतील अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी जमा झालं आहे. दिल्लीतील अत्यंत व्यस्त धौला कुला भागात पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
नक्की वाचा - Monsoon reaches Kerala : आला रे आला! मान्सून आठवडाभरापूर्वीच केरळात दाखल, भारतीय हवामान विभागाची घोषणा
पावसामुळे दिल्ली विमानतळावरही परिणाम...
रविवारी मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे दिल्ली विमानतळावरील विमान वाहतूक विस्कळीत झाली. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (IGIA) हे देशातील सर्वात मोठे विमानतळ आहे. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइटराडार 24.कॉमनुसार, एअरपोर्टवर अनेक विमानं उशीराने आहेत. तर काही उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. काही विमानांना 30 मिनिटांचा विलंब होत असल्याचं सांगितलं जात आहे.
Red warning issued in Nowcast for Delhi and NCR valid for next 2-3 hours
— ANI (@ANI) May 24, 2025
Light to moderate rain accompanied with severe thunderstorm/lightning/hailstorm, and strong surface wind (60-100 kmph) likely to occur: IMD
देशाच्या इतर भागातही हवामानात बदल नोंदवण्यात आला आहे. मुंबईत पुन्हा एकदा पावसाची नोंद झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world