
अखेर मान्सून केरळात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने यासंदर्भात घोषणा केली आहे. यंदा लवकरच मान्सून दाखल होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. 24 तासात मान्सून केरळात दाखल होणार असल्याचं अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला जात होता. मात्र त्यापूर्वीच मान्सूनने केरळात हजेरी लावली आहे. 2009 नंतर पहिल्यांदा मान्सून इतक्या लवकर भारतात दाखल झाल्याचं पीटीआयने आपल्या वृत्तात सांगितलं आहे.
Monsoon reaches Kerala; earliest onset over Indian mainland since 2009: IMD
— Press Trust of India (@PTI_News) May 24, 2025
साधारणपणे मान्सून 1 जूनच्या सुमारास केरळमध्ये पोहोचतो. परंतु यंदा तो 24 मे रोजी म्हणजेच सुमारे एक आठवडा आधी पोहोचला आहे. आयएमडीने नुकताच मान्सून संदर्भात अंदाज व्यक्त केला होता. मात्र अंदाजापूर्वीच मान्सून भारतात दाखल झाला आहे. IMD ने लिहिलं, दक्षिण पश्चिम मान्सून आज 24 मे 2025 रोजी केरळात दाखल झाला आहे. सर्वसाधारणपणे १ जूनला मान्सूनचं केरळात आगमन होतं. मात्र आठ दिवसांपूर्वीच मान्सूनने केरळात हजेरी लावली आहे.
नक्की वाचा - Ujani Dam : पावसाळ्यापूर्वीच उजनी धरणाची पाणी पातळी वाढली, अवघ्या 3 दिवसात मोठी वाढ
2009 मध्ये 23 मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला होता. तर तब्बल 16 वर्षांनी पहिल्यांदा मान्सूनचं लवकर आगमन झालं आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून केरळमध्ये लवकर दाखल झाला म्हणून तो इतर राज्यांमध्येही लवकर येईलच असं नाही. त्यामुळे केरळमध्ये जरी मान्सूनची एन्ट्री झाली असली तरी महाराष्ट्रात मान्सूनच्या स्वागतासाठी प्रतीक्षा करावी लागू शकते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world