Mahakumbh 2025 : सनातन धर्माच्या भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा अविष्कार असलेला कुंभमेळा सध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये होत आहे. 12 कुंभमेळ्यानंतर तब्बल 144 वर्षांनी महाकुंभचा योग यंदा जुळून आला आहे. आयुष्यात एकदाच मिळणारी महाकुंभच्या पर्वणीनिमित्त संपूर्ण देश सध्या 'कुंभमय' झाला आहे.
फक्त आपल्या देशातूनच नाही तर संपूर्ण जगभरातून भाविकांचा ओघ प्रयागराजमध्ये सुरु आहे. या भक्तांच्या सेवेसाठी अदाणी समूह पुढे सरसावला आहे. अदाणी समूह इस्कॉन आणि गीत प्रेसच्या मदतीनं महाकुंभात येणाऱ्या भाविकांची सेवा करत आहे. इस्कॉनच्या मदतीनं अदाणी समूहाच्या वतीनं रोज एक लाख भाविकांच्या महाप्रसादाचं वितरण करण्यात येत आहे. महाकुंभाच्या परिसरात 'अदाणी महाप्रसादा'चे आयोजन केले जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अदाणी समूहाचे संचालक गौतम अदाणी यांनी 21 जानेवारी रोजी महाकुंभात उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण दिवस महाकुंभात घालवला. प्रयागराजमधील त्रिवेणी संगमात पूजा केली. त्याचबरोबर ते इस्कॉन मंडपात आयोजित भंडारा सेवेमध्येही सहभागी झाले होते.
गौतम अदाणी यांनी लिंकडीन (linkedin) वेबसाईटवर 'Spiritual Infrastructure: How The Kumbh Inspires India's Leadership Story' हा विशेष लेख लिहिला आहे. या लेखात त्यांनी कुंभमेळा कदाचित जगातील सर्वात मोठी मॅनेजमेंट केस स्टडी अस्ेल, असं मत व्यक्त केलं आहे. अदाणी यांनी विशेष लेखात कुंभमेळा हा 'खऱ्या भारताची गोष्ट' असल्याचं सांगितलं असून त्यापासून जगानं काय शिकलं पाहिजे हे समजावून सांगितलं आहे.
महाकुंभमेळा आणि आध्यात्मिक पायाभूत सुविधा
हावर्ड बिझनेस स्कूलने जेव्हा कुंभ मेळाच्या लॉजिस्टिक्सचा अभ्यास केला तेव्हा त्याचे प्रमाण पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. जेव्हा समर्पण आणि सेवा यासह 20 कोटी लोक एकत्र येतात, तेव्हा हे केवळ एक आयोजन नव्हे तर एक अद्वितीय आध्यात्मिक संगम घडतो. खरे नेतृत्व हे आदेश देण्यात नव्हे तर सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या क्षमतेत आहे, 'असे अदाणी यांनी या लेखात स्पष्ट केले आहे.
दर 12 वर्षांनी, न्यूयॉर्कपेक्षा मोठे तात्पुरते शहर पवित्र नद्यांच्या काठावर वसवले जाते. बोर्डाच्या बैठका नाहीत. PowerPoint सादरीकरण नाही. उद्यम भांडवल नाही. शतकानुशतकांच्या भारतीय शिक्षणपद्धतीतून ही शुद्ध, काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली परंपरा सुरु आहे, अशी भावना अदामी यांनी व्यक्त केली आहे.
( नक्की वाचा : Gautam Adani at Mahakumbh : गौतम अदाणी यांनी त्रिवेणी संगमावर केली पूजा, गंगा मातेचा घेतला आशीर्वाद )
तुम्ही पुढील काळात भारताची यशोगाथा समाजवून घ्याल त्यावेळी लक्षात ठेवा की, आपला सर्वात यशस्वी प्रकल्प म्हणजे कोणते बंदर किंवा एनर्जी पार्क नाही. तर शतकानुशतके यशस्वीपणे सुरु असलेला आध्यात्मिक मेळावा आहे. लाखो लोकांची सेवा करणे आहे, असं अदाणी यांनी स्पष्ट केलं.
ही भारताची खरी गोष्ट (Real India story) आहे. जगानं यापासून नेतृत्त्वाचे धडे घेतले पाहिजेत, असं अदाणी यांनी या लेखात म्हंटलं आहे.
अदाणी समूहाचे संचालक गौतम अदाणी यांचा संपूर्ण लेख वाचण्यासाठी इथं क्लिक करा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world