जाहिरात
This Article is From Jul 14, 2024

VIDEO: पती-पत्नी रेल्वे पुलावर सेल्फी काढण्यात व्यस्त, अचानक समोरुन आली ट्रेन; त्यानंतर भयंकर घडलं...

Viral Video : रेल्वे पुलावर एक जोडपं सेल्फी काढण्यात व्यस्त होतं. मात्र त्याचवेळी अचानक समोरून ट्रेन आली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या काहींना आवाज देत त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला.

VIDEO: पती-पत्नी रेल्वे पुलावर सेल्फी काढण्यात व्यस्त, अचानक समोरुन आली ट्रेन; त्यानंतर भयंकर घडलं...

Railway Bridge Accident:  राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोरम घाटत फोटोशूट करणे एका जोडप्याच्या चांगलच अंगलट आलं. रेल्वे ट्रॅकवर सेल्फी काढत असताना अचानक ट्रेन समोर आली, त्यानंतर घाबरलेल्या पती-पत्नीने खोल दरीत उडी घेतली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

डोंगरावरील हिरवाईमुळे गोरम घाटाचे दृश्य पाहण्यासाठी पावसाळ्यात येथे पर्यटकांची मोठी गर्दी होते. आकर्षक आणि मनमोहक दृश्याचा आनंद घेण्यासाठी बाहेरून पर्यटकही मारवाडमध्ये येतात. मात्र अनेकदा पर्यटक जीव धोक्यात घालून गोरम घाटात रेल्वे पुलावरून प्रवास करतात. शनिवारीही असाच काहीसा प्रकार घडला. 

(नक्की वाचा - निसर्ग कोपला; अख्खा डोंगर खचला, धडकी भरवणारा VIDEO)

रेल्वे पुलावर एक जोडपं सेल्फी काढण्यात व्यस्त होतं. मात्र त्याचवेळी अचानक समोरून ट्रेन आली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या काहींना आवाज देत त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला. मात्र समोरुन येणारी ट्रेन पाहून पती-पत्नी घाबरले आणि त्यांनी तातडीने रेल्वे पुलावरून खोल दरीत उडी मारली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

(नक्की वाचा - सिनेमा नाही सत्य! 'या' व्यक्तीला दर शनिवारी चावतो साप! नेमका काय आहे प्रकार?)

मिळालेल्या माहितीनुसार, बागरीतील कलाल पिपलिया येथे राहणारा राहुल आणि त्याची पत्नी जान्हवी गोरम घाटावर दर्शनासाठी आले होते. दरम्यान रेल्वे पुलावर पती-पत्नी सेल्फी घेण्यासाठी मध्यभागी थांबले. त्यानंतर हा सगळा प्रकार घडला. राहुलची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला  जोधपूरला उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: