- 26 जानेवारी 2026 रोजी देशातील पहिली हायड्रोजन ट्रेनची जींद ते सोनीपतदरम्यान चाचणी सुरू करण्यात येणार आहे.
- हायड्रोजन ट्रेनचे प्रवासी भाडे किमान पाच रुपये आणि जास्तीत जास्त 25 रुपये असेल.
- ट्रेन धूर सोडणार नाही आणि आवाजही करणार नाही, ट्रेन इलेक्ट्रोकेमिकल तंत्रज्ञानावर आधारित आहे.
India First Hydrogen Train Fare: भारत आता केवळ ऐतिहासिक गोष्टी वाचणारा देश राहिलेला नाही तर भविष्य घडवणारा देश बनलाय. वर्ष 2026ची सुरुवात भारतीय रेल्वेसाठी क्रांतिकारी ठरणार आहे. कारण देशाची पहिली हायड्रोजन ट्रेन (Hydrogen Train) नागरिकांच्या सेवेसाठी पूर्णपणे सज्ज झालीय. ही ट्रेन केवळ पर्यावरणपूरकच नव्हे तर याचा प्रवास सर्वसामान्य माणसाच्या खिशालाही परवडणाराही असणार आहे.
देशाला मिळणार मोठं गिफ्ट
26 जानेवारी 2026 रोजी भारत जगाला आपली ग्रीन एनर्जीची ताकद दाखवणार आहे. या दिवशी हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या ट्रेनची चाचणी सुरू होणार आहे. ही ट्रेन हरियाणातील जींद ते सोनीपतदरम्यान 90 किलोमीटरचे अंतर पार करेल.
प्रवासीभाडे ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का | First Hydrogen Train Ticket Fare
या ट्रेनच्या प्रवासी भाड्याबाबतची बातमी सर्वात आश्चर्यचकीत करणारी तसेच दिलासादायक आहे. आजच्या काळात वेग आणि सुविधांच्या नावाखाली मोठे भाडे आकारले जाते, मात्र रिपोर्टनुसार या हाय-टेक ट्रेनचे भाडे किमान 5 रुपये आणि जास्तीत जास्त फक्त 25 रुपये असू शकते. विद्यार्थी, नोकरदार आणि दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी ही ट्रेन एखाद्या वरदानाप्रमाणे असेल.
हायड्रोजन ट्रेनचं वैशिष्ट्यया ट्रेनचं वैशिष्ट्य म्हणजे ही ट्रेन धूरही सोडणार नाही आणि आवाजही करणार नाही. ही ट्रेन इलेक्ट्रोकेमिकल तंत्रज्ञानावर आधारित आहे, ज्यामध्ये नऊ किलो पाण्यापासून हायड्रोजन इंधन तयार करून ट्रेन चालवली जाते. ट्रेनची डिझाइन स्पीड 150 किमी प्रतितास आहे. प्रत्यक्ष ऑपरेशनदरम्यान ती 110 ते 140 किमी प्रतितास वेगाने धावेल, त्यामुळे जींद ते सोनीपतचा प्रवास दोन तासांऐवजी 1 तासापेक्षाही कमी वेळात पूर्ण होईल.
हाय-टेक प्रवासी डबेया ट्रेनमध्ये 8 प्रवासी डबे असतील. त्यामध्ये ऑटोमॅटिक दरवाजे, एअर कंडिशनिंग, डिजिटल डिस्प्ले आणि मॉडर्न डिझाइन यासारख्या सुविधा उपलब्ध असतील.
(नक्की वाचा: 'धावत्या ट्रेनमध्ये WI-FI ची सुविधा का नाही?', ऑफिसच्या टेन्शनमुळे वैतागलेल्या प्रवाशाला मिळालं भन्नाट उत्तर)
स्वदेशी तंत्रज्ञानहा प्रकल्प आरडीएसओ (RDSO) आणि स्पॅनिश कंपनी ग्रीन एच यांनी एकत्रित विकसित केलाय. तसेच यासाठी जींद येथे देशातील सर्वात मोठं हायड्रोजन प्लांट उभारण्यात आलंय.
प्रदूषणाला बायबायआतापर्यंत डिझेल ट्रेनमुळे प्रदूषण होत होते आणि इलेक्ट्रिक ट्रेन वीजेवर अवलंबून होत्या. पण हायड्रोजन ट्रेन हे भविष्यातील इंधन आहे. ही ट्रेन 'मेक इन इंडिया' आणि 'ग्रीन इंडिया'च्या संगमाचे मोठे उदाहरण आहे. 26 जानेवारी 2026 हा दिवस भारतीय वाहतूक इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल, कारण त्या दिवशी ट्रेन पाण्यावर धावेल आणि भाडे सामान्य माणसाच्या बजेटमध्ये असेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
