जाहिरात

India vs Pakistan : पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणांमधून रेडिएशन होतंय का? IAEA काय सांगितलं?

Operation Sindoor: पाकिस्तानशी सुरू असलेल्या संघर्षादरम्यान भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या किराना हिल्सवर हवाई हल्ला केल्याचे दावे केले जात होते.

India vs Pakistan : पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणांमधून रेडिएशन होतंय का?  IAEA काय सांगितलं?
Pakistan Kirana Hills

Pakistan Nuclear Radiation : भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. या हल्ल्यात अण्वस्त्रे ठेवलेल्या ठिकाणाचं देखील काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती माध्यमे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात तातडीने झालेल्या शस्त्रसंधीनंतर ही चर्चा वेगाने होऊ लागली होती.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पाकिस्तानच्या किराना हिल्स परिसरातील बोगद्यांमध्ये ठेवलेल्या अण्वस्रांना धक्का लागल्याचं बोललं जात होतं. त्यातून रेडिएशन सुरु झाल्याच्याही बातम्या, पोस्ट समोर येत होत्या. आता आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (IAEA) याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. पाकिस्तानमधील कोणत्याही अण्वस्त्र ठेवलेल्या ठिकाणाला नुकसान झालेलं नाही. तसेच कोणतंही रेडिएसन नाही, असं IAEA ने स्पष्ट केलं आहे. द इंडियन एक्सप्रेसने याबाबतचं वृत्त प्रसारित केलं आहे. 

( नक्की वाचा : Indus Water Treaty : पाकिस्तानची पाण्यासाठी तडफड, पत्र लिहून केली विनंती, भारताची भूमिका काय? )

पाकिस्तानशी सुरू असलेल्या संघर्षादरम्यान भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या किराना हिल्सवर हवाई हल्ला केल्याचे दावे केले जात होते. ज्यामुळे तेथे असलेल्या अण्वस्त्र ठिकाणांचं नुकसानं झालं आणि रेडिएशन सुरु झालं. मात्र भारतीय हवाई दलाने स्पष्ट केले होते की त्यांनी किराना हिल्सवर हल्ला केला नव्हता.

एका प्रश्नाच्या उत्तरात, IAEA च्या प्रवक्त्याने सांगितले की, "तुम्ही ज्या अहवालांचा संदर्भ देत आहात त्याची आम्हाला माहिती आहे. IAEA कडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे, पाकिस्तानमधील कोणत्याही अण्वस्त्र ठेवलेल्या ठिकाणाला धक्का लागलेला नाही किंवा गळती झालेली नाही." अमेरिकेतील सरकारी अधिकाऱ्यांनी याबाबत सोमवारी असा कोणताही हल्ला झाला नसल्याचे स्पष्ट केले होते.

( नक्की वाचा : Operation Sindoor भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये अणुगळती झाली? परराष्ट्र मंत्रालयानं दिलं स्पष्टीकरण )

IAEA ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे जी अणुऊर्जेच्या शांततापूर्ण वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अण्वस्त्रांसह कोणत्याही लष्करी हेतूसाठी तिचा वापर रोखण्यासाठी प्रयत्न करते. त्याची स्थापना 1957 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या (UN) अंतर्गत करण्यात आली होती.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com