आशियातील दोन प्रमुख अर्थव्यवस्था, भारत आणि सौदी अरेबिया, यांच्यात आता क्रिकेटच्या माध्यमातून आर्थिक भागीदारी वाढणार आहे. भारतीय वित्तीय क्षेत्रातील अनुभवी सल्लागार मंदार श्रीकांत जोशी यांनी सौदी अरेबियातील क्रिकेट आणि क्रीडा क्षेत्रासाठी 150 कोटी रुपये (17.7 दशलक्ष डॉलर्स) गुंतवणुकीचा प्रस्ताव सादर केला होता. सौदी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष, प्रिन्स सौद बिन मिशाल अल सौद यांच्यासोबत जोशी यांची यासंदर्भात भेट झाली. मंदार जोशी यांनी मांडलेला प्रस्ताव प्रिन्स सौद यांना आवडल्याने त्यांनी या संदर्भातील व्यावसायिक आणि गुंतवणूक सल्लागार करारावर सही केली.
नक्की वाचा: राम मंदिरावरील ध्वजात दडलंय काय? PM मोदींनी सांगितले 13 'शक्तीशाली' अर्थ, वाचून वाटेल अभिमान
सौदीतील क्रिकेट क्षेत्राला बळकटी मिळण्याची आशा
या आर्थिक भागीदारीसंगर्भात बोलताना मूळचे महाराष्ट्रातील असलेले आणि आता दुबईत स्थायिक झालेल्या मंदार जोशी यांनी म्हटले की, ही गुंतवणूक सौदी अरेबियाच्या क्रिकेट क्षेत्राला बळकट करण्यासाठी वापरली जाईल. यामध्ये नवीन स्टेडियम्स बांधणे, विद्यमान सुविधांचा दर्जा वाढवणे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट इव्हेंट्सच्या आयोजनासाठी आर्थिक पाठबळ पुरवणे यांचा समावेश आहे. सौदी अरेबियाला क्रिकेटच्या नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. येत्या काळात आणखी काही गुंतवणूकदार पुढे येतील आणि ही रक्कम वाढत जाईल असे जोशी यांनी सांगितले.
नक्की वाचा: लग्नात 'आयव्ही बार'चा ट्रेंड! पाहुणे मंडळी थेट ड्रिप लावून घेतात; नेमका प्रकार काय?
मराठी माणसाची नेत्रदीपक कामगिरी
क्रिकेट हा भारतीयांचा आवडता खेळ असल्याने, या गुंतवणुकीला विशेष महत्त्व आहे. प्रिन्स सौद यांनी 'व्हिजन 2030' मांडले असून त्याअंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांमुळे या सगळ्या गोष्टींना बळकटी मिळाल्याचे मंदार जोशी यांनी सांगितले. मंदार जोशी हे भारतातील अनेक मोठ्या उद्योजकांचे सल्लागार आणि निधी व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.