Pune News : मित्र-मैत्रिणींना पत्र लिहा आणि रोख 50 हजार जिंका; पुण्यातील 'या' स्पर्धेची राज्यभरात चर्चा

पूर्वीच्या काळी आपल्या आप्तजनांना पत्र पाठवून खुशाली कळवली जात होती. पुण्यात पत्र लिहिण्यासाठी का सांगितलं जात आहे?

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune Letter writing competition : सध्या डिजिटल युगामुळे मेल आणि मेसेजची चलती आहे. पूर्वीच्या काळी आपल्या आप्तजनांना पत्र पाठवून खुशाली कळवली जात होती. त्याची मजा काही औरच होती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. असं असतानाही पुण्यात मात्र पत्र लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. 

पुण्यात भरणाऱ्या या स्पर्धेची राज्यभरात चर्चा

भारतीय टपाल विभागाच्यावतीने (Indian Postal Department) विद्यार्थ्यांमध्ये पत्रलेखनाची आवड निर्माण व्हावी यासाठी अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेअंतर्गत आपल्या मित्र-मैत्रिणींना पत्र लिहिण्याचं आवाहन केलं जात आहे. या स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्या विद्यार्थ्याला तब्बल ५० हजारांचं रोख बक्षीस मिळणार आहे. ही स्पर्धा शाळा पातळीवर आयोजित करण्यात येणार असून त्यानंतर सर्व पत्र संबंधित पोस्ट कार्यालयात जमा करण्यात येणार आहे. याशिवाय विद्यार्थी पोस्ट कार्यालयातही पत्र जमा करू शकणार आहेत. 

नक्की वाचा - पुण्यात MPSC ची तयारी, लोणावळ्यात नाश्त्यासाठी थांबला अन् भयंकर घडलं; फेरफटका जीवावर बेतला

स्पर्धेचे नियम आणि अटी...

मिळालेल्या माहितीनुसार, या स्पर्धेत ९ ते १५ वर्षे वयोगटातील शाळेतील विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत. शब्दमर्यादा ८०० शब्दांची आहे. मराठी, इंग्रजी किंवा भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीतील कोणत्याही भाषेत पत्र लिहिता येणार आहे. स्पर्धेची अंतिम तारीख ८ मार्च २०२६ असून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ७ मार्च २०२६ आहे. या स्पर्धेतून निवड झालेल्या सर्वोत्तम पत्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठवली जाणार आहे.  

राज्यस्तरावरील बक्षीसं - २५ हजार (प्रथम), १० हजार (द्वितीय), ५ हजार (तृतीय)

राष्ट्रीय स्तरावरील बक्षीसं - ५० हजार (प्रथम), २५ हजार (द्वितीय), १० हजार (तृतीय)

स्पर्धेचं ठिकाण - एस.पी कॉलेज पोस्ट ऑफिस