जाहिरात

तुमच्या कन्फर्म तिकिटावर दुसरी व्यक्ती करू शकते प्रवास, रेल्वेचा हा नियम नक्की जाणून घ्या, फायदा होईल!

आरक्षित श्रेणीच्या तिकीटांबद्दल सांगायचं झाल्यास काही नियम असेल आहे जे फार कुणाला माहीत नसतात. त्यामुळे असे नियम जाणून घेणे आवश्यक आहेत. 

तुमच्या कन्फर्म तिकिटावर दुसरी व्यक्ती करू शकते प्रवास, रेल्वेचा हा नियम नक्की जाणून घ्या, फायदा होईल!
Train Ticket Transfer Rules

Diwali Train Ticket Transfer Rules:  दिवाळीत घरी जाण्यासाठी ट्रेनमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. स्लीपर आणि जनरल कोचमध्ये तर पाय ठेवायलाही जागा नाही. मात्र आरक्षित श्रेणीच्या तिकीटांबद्दल सांगायचं झाल्यास काही नियम असेल आहे जे फार कुणाला माहीत नसतात. त्यामुळे असे नियम जाणून घेणे आवश्यक आहेत. 

तुमच्या नावावर कन्फर्म तिकीट असेल तर त्या तिकिटावरुन दुसरी व्यक्तीही प्रवास करू शकते. याचा अर्थ आईच्या आरक्षित तिकिटावरुन मुलगा किंवा मुलगी किंवा वडिलांच्या आरक्षित तिकीटावरुन पती, मुलगा, मुलगी प्रवास करू शकतात. रक्ताचं नातं असलेल्या व्यक्तीच्या तिकिटावरुन तुम्ही प्रवास करू शकता. 

रेल्वे प्रवासी आपलं कन्फर्म तिकीट  (Confirmed Train Ticket) कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला ट्रान्सफर करू शकतात. मात्र यासाठी त्यांना एक अर्ज करावा लागतो. ट्रेन प्रवास सुरू होण्याच्या २४ तासांपूर्वी आरक्षित श्रेणीच्या काऊंटरवर एक लिखित अर्ज द्यावा लागतो. यामध्ये मूळ तिकीट आणि नव्या रेल्वे प्रवाशाच्या ओळखपत्राची फोटोकॉपी द्यावी लागते. 

First houseboat in Konkan : कोकणात 8 खोल्यांची पहिली हाऊसबोट दाखल, कसं कराल बुकिंग, दर किती? 

नक्की वाचा - First houseboat in Konkan : कोकणात 8 खोल्यांची पहिली हाऊसबोट दाखल, कसं कराल बुकिंग, दर किती?

ट्रेनचं तिकीट हस्तांतरित करण्याचा नियम

ट्रेनचं तिकीट ट्रान्सफर करता येऊ शकतं. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला हे तिकीट हस्तांतरित करण्यासाठी त्या दोघांमधील रक्ताचं नातं आहे हे सिद्ध करणाऱ्या कागदपत्राची गरज असते. 

रेल्वे तिकीट हस्तांतरित कसं कराल?

रेल्वे प्रवाशांनी तिकीटाचं प्रिंटआऊट घ्यावा आणि नव्या रेल्वे प्रवाशाचं ओळखपत्र उदा आधारकार्ड, पॅनकार्ड आदीची फोटोकॉपी ठेवा. ज्या रेल्वे स्टेशनच्या आरक्षित श्रेणी काऊंटवर तिकीट बुक झालंय तेथेच ते हस्तांतरित होतं असं नाही. तुम्ही कोणत्याही जवळच्या रेल्वे स्टेशनवर हा अर्ज देऊ शकता. एकदा तिकीट हस्तांतरण झाल्यानंतर नव्या प्रवाशाच्या नावाने नवं तिकीट जारी झालं, त्यानंतर पुन्हा तिकीट हस्तांतरित होऊ शकत नाही. 


रेल्वे तिकीट हस्तांतरित करण्याचे शुल्क

रेल्वे तिकीट हस्तांतरित करण्यासाठी (Train ticket transfer charges) कोणतेही शुल्क आकारले जात नाही. जर तुमच्याकडून कोणी पैसे मागत असेल तर हे चुकीचं आहे. रेल्वेकडून ही सेवा निशुल्क आहे. तुम्हाला केवळ रेल्वे सुटण्याच्या २४ तासांपूर्वी अर्ज दाखल करावा लागेल. 


आणखी काही पर्याय...

१ सरकारी अधिकारी स्वत:चं तिकीट काही विशेष परिस्थितीत दुसऱ्याला ट्रान्सफर करू शकतात. 
२ विद्यार्थी आपलं तिकीट दुसऱ्याला ट्रान्सफर करू शकतात. जर ते एकत्रितपणे प्रवास करीत असतील आणि संस्थेकडून याला परवानगी असेल. 
३ लग्न समारंभासाठी जर मोठ्या संख्येने लोक एकत्रितपणे प्रवास करीत असतील तर तेदेखील अशा प्रकारे ट्रेन तिकीट ट्रान्सफर करू शकतात. 

  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com