जाहिरात

Indian Railway : रेल्वेचा 'हा' नियम पाळला तरच मिळेल 20% डिस्काउंटचा फायदा, अन्यथा होईल नुकसान

परतीच्या प्रवासाचीही तिकीटं काढली तर प्रवाशांना 20 टक्क्यांपर्यंत सवलत मिळेल.

Indian Railway : रेल्वेचा 'हा' नियम पाळला तरच मिळेल 20% डिस्काउंटचा फायदा, अन्यथा होईल नुकसान
  • भारतीय रेलवे ने राउंड ट्रिप पैकेज सुविधा की घोषणा की है, जिसमें रिटर्न टिकट पर 20% की छूट मिलेगी
  • यह सुविधा 14 अगस्त 2025 से एक्सपेरिमेंटल बेसिस पर शुरू होगी और यात्रियों का फीडबैक लिया जाएगा
  • वापसी और जाने की टिकट एक ही यात्री के नाम पर होनी चाहिए और दोनों टिकट कंफर्म होने आवश्यक हैं
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Indian Railway News : भारतीय रेल्वेतून दररोज लाखो लोक प्रवास करतात. त्यातही सण-उत्सवादरम्यान हा आकडा वाढतो. ज्यामुळे अनेकदा तिकीट बुकिंगबाबत प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. ही समस्या दूर करण्यासाठी रेल्वे लवकरच एक खास सुविधा सुरू करणार आहे. याला राऊंड ट्रिप पॅकेज म्हटलं जात आहे. ज्यामुळे तिकीट बुकिंगवेळी होणाऱ्या त्रासापासून सुटका होण्याची शक्यता आहे. मात्र या सुविधाबाबत रेल्वेने काही नियम दिले आहेत. जे पूर्ण केल्यानंतर या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. 

राऊंड ट्रिप सुविधा काय आहे?  l (What is Round Trip Facility)

रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी पाहता राऊंड ट्रिप पॅकेज सुविधेवर रेल्वेकडून काम केलं जात आहे. यामध्ये रिटर्न प्रवासासाठी 20 टक्क्यांपर्यंत ( facility to passengers 20% discount ) सूट मिळेल. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही एकाच वेळी येताना आणि जातानाचे तिकीट बुक केले तर याबदल्यात रेल्वेकडून 20 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. रेल्वेचे म्हणणे आहे की, या सुविधेमुळे गाड्यांचा योग्य वापर होईल आणि आगाऊ नियोजनामुळे प्रवाशांना सणासुदीच्या काळात कोणतीही अडचण येणार नाही. 

आज नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ, बुकिंगपूर्वी या 5 गोष्टी माहीत असायला हव्यात

नक्की वाचा - आज नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ, बुकिंगपूर्वी या 5 गोष्टी माहीत असायला हव्यात

कधीपासून या सुविधेला सुरुवात?

प्रायोगिक तत्वावर ही सुविधा 14 ऑगस्ट 2025 पासून सुरू करण्यात येणार आहे. प्रवाशांकडून याबाबत प्रतिक्रिया मागविण्यात येणार आहे. सर्वकाही सुरळीत सुरू असल्यासं देशभरात ही सुविधा लागू करण्यात येईल. 

या दिवसात तिकीट बुक करू शकता..

ही सुविधा 14 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचं रेल्वेने सांगितलं असलं तरी प्रवासाचं (जाण्याचं)  तिकीच 13 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबरदरम्यान आणि परतीचं तिकीट 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 दरम्यानचं असायला हवं. याचा अर्थ या कालावधीत तुम्ही बुकिंग केलं तरच तुम्हाला 20 टक्के सवलतीचा लाभ घेता येऊ शकेल. 

  • दोन्ही बाजूंची तिकिटे एकाच प्रवाशाच्या नावावर असावीत.
  • ही सुविधा दोन्ही बाजूंची तिकिटे कन्फर्म झाल्यावरच मिळू शकते.
  • तिकिटं रद्द केल्यास कोणताही परतावा दिला जाणार नाही.
  • येण्यासाठी आणि जाण्यासाठी तिकिटं एकाच वेळी आणि एकाच माध्यमातून बुक करावीत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com