
Indian Railway : भारतीय रेल्वेने देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय प्रवाशांना अधिक चांगल्या आणि परवडणाऱ्या सेवा देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेने त्यांच्या गाड्यांमधील नॉन-एसी डब्यांचे प्रमाण सुमारे 70 टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. यामुळे मोठ्या संख्येने सामान्य प्रवाशांना चांगल्या दर्जाचा आणि आरामदायी प्रवास करणे शक्य होणार आहे.
या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत, भारतीय रेल्वेने नॉन-एसी 'अमृत भारत' आणि 'नमो भारत रॅपिड रेल' सेवा सुरू केल्या आहेत, ज्या मोठ्या लोकसंख्येला सेवा देण्यावर लक्ष केंद्रित करतात. याशिवाय, पुढील पाच वर्षांत अतिरिक्त 17,000 नॉन-एसी जनरल आणि स्लीपर डबे तयार करण्यासाठी एक विशेष उत्पादन कार्यक्रमसुरू आहे. हा कार्यक्रम प्रवाशांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल.
(नक्की वाचा- BMC Recruitment: मुंबई महापालिकेमध्ये बंपर भरती! अनुपस्थित विद्यार्थ्यांना 'या' तारखेला शेवटची संधी)
गेल्या आर्थिक वर्षात (2024-25) 1,250 जनरल डबे विविध लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये वापरण्यात आले. जनरल, अनारक्षित डब्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ दिसून आली आहे. 2022-23 मध्ये ही संख्या 553 कोटी होती, ती वाढून 2024-25 मध्ये 651 कोटींपर्यंत पोहोचली आहे.
सध्या, एकूण जागांपैकी (54 लाख) 78 टक्के जागा नॉन-एसी आहेत, तर उर्वरित 22 टक्के जागा एसी डब्यांमध्ये आहेत. मेल, एक्सप्रेस गाड्यांच्या धोरणानुसार, आता 22 डब्यांच्या ट्रेनमध्ये 12 जनरल आणि स्लीपर क्लास नॉन-एसी डबे, तर 8 एसी डबे असतील. यामुळे नॉन-एसी प्रवाशांना अधिक जागा उपलब्ध होतील.
(नक्की वाचा- Devendra Fadnavis: उद्योगांच्या सर्व परवानग्या आता मैत्री पोर्टलवर ऑनलाईन मिळणार)
भारतीय रेल्वे परवडणाऱ्या प्रवासासाठी अनारक्षित नॉन-एसी पॅसेंजर सेवा देखील चालवते. पूर्णपणे नॉन-एसी असलेल्या 'अमृत भारत' ट्रेनचीही ओळख करून दिली जात आहे, ज्या नॉन-एसी प्रवाशांना आधुनिक आणि आरामदायक रेल्वे प्रवासाचा अनुभव देण्यासाठी डिझाइन केल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world