
BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘कार्यकारी सहायक' या संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अंतर्गत प्रवर्गनिहाय तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी तथा नियुक्तीच्या पुढील कार्यवाहीसाठी दिनांक १ ऑगस्ट २०२५ पर्यंत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
या कालावधीदरम्यान अनुपस्थित असलेल्या उमेदवारांना महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने दिनांक १४ ऑगस्ट २०२५ पर्यंत कागदपत्रे पडताळणी आणि नियुक्तीच्या पुढील कार्यवाहीसाठी अंतिम संधी देण्यात आली आहे.
(नक्की वाचा : ST News : एसटी महामंडळाला मोठा दिलासा! दरवर्षी होणार 12 कोटींची बचत )
तरी, संबंधित उमेदवारांनी दिनांक १४ ऑगस्ट २०२५ पर्यंत, सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत ‘प्रमुख कर्मचारी अधिकारी कार्यालय, सहावा मजला, विस्तारित इमारत, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, महापालिका मार्ग, मुंबई - ४००००१' येथे उपस्थित राहावे.
या अंतिम संधी कालावधीदरम्यानही अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना ‘कार्यकारी सहायक' पदाकरिता स्वारस्य नाही, असे गृहित धरुन त्यांचे नाव तात्पुरत्या निवड यादीतून वगळण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world