जाहिरात

indiGO Plane News: एका नियमामुळे 'इंडिगो ठप्प', कर्मचारी गेले कुठे? तब्बल 3 महिने खोळंबा होणार?

शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत दिल्ली, बेंगळुरू, पुणे आणि हैदराबादमध्ये तब्बल ३९१ उड्डाणे रद्द करण्यात आली. दिल्लीमध्ये सर्वाधिक फ्लाईट्स रद्द झाल्या आहेत

indiGO Plane News: एका नियमामुळे 'इंडिगो ठप्प', कर्मचारी गेले कुठे? तब्बल 3 महिने खोळंबा होणार?

Indigo Airlines and DGCA: देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो सलग चौथ्या दिवशीही क्रु कर्मचारी नसल्यामुळे मोठा फटका बसला आहे. . कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत दिल्ली, बेंगळुरू, पुणे आणि हैदराबादमध्ये तब्बल ३९१ उड्डाणे रद्द करण्यात आली. दिल्लीमध्ये सर्वाधिक रद्द (२२५) झाल्या, त्यानंतर बेंगळुरू (१०२), पुणे (३२) आणि हैदराबाद (३२) यांचा क्रमांक लागतो. यामध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही प्रकारच्या उड्डाणांचा समावेश आहे. इंडिगोच्या शेकडो उड्डाणांनाही विलंब होत आहे. यामुळे मोठ्या संख्येने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

इंडिगोच्या गोंधळामागचे कारण काय?

फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) नियम लागू केल्याने हा सर्व गोंधळ झाल्याचं इंडियाने म्हटलं आहे.  DGCA ने वैमानिक आणि इतर क्रू सदस्यांसाठीच्या कामाच्या नियमांमध्ये १ नोव्हेंबरपासून सुधारणा केल्या आहेत. याला फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) म्हणतात. हे दोन टप्प्यात लागू करण्यात आले. पहिला टप्पा १ जुलैपासून लागू झाला.

5 शहर, 400 फ्लाइट, 12 तासांची प्रतिक्षा! असं काय घडलं ज्यामुळे हवेतील विमान जमिनीवर अडकली?

दुसरा टप्पा १ नोव्हेंबरपासून लागू झाला. नवीन नियमांमध्ये प्रवाशांची सुरक्षितता वाढविण्यासाठी वैमानिक आणि क्रू यांना पुरेशी विश्रांती देण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे विमान कंपन्यांसाठी वैमानिक आणि क्रू सदस्यांची अचानक कमतरता निर्माण झाली आहे. DGCA ने अहवाल दिला आहे की नोव्हेंबरमध्ये एकूण १,२३२ इंडिगो उड्डाणे रद्द करण्यात आली, ज्यात FDTL नियमांमुळे ७५५ उड्डाणे रद्द करण्यात आली.

परिस्थिती कधी सुधारेल?

एअरलाइनने डीजीसीएला आश्वासन दिले आहे की दुरुस्तीचे उपाय आधीच सुरू आहेत आणि १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत कामकाज पूर्णपणे सामान्य होईल. इंडिगोने सांगितले की त्यांच्या पुनर्प्राप्ती योजनेत जलद क्रू भरती, वाढीव प्रशिक्षण आणि पुरेसे कर्मचारी आणि रोस्टर संख्या सुनिश्चित झाल्यानंतर उड्डाणे हळूहळू पुन्हा सुरू करणे समाविष्ट आहे.

तसेच नवीन नियम, क्रू नियोजनातील अडचणी आणि हिवाळी हंगामामुळे होणाऱ्या ऑपरेशनल अडचणी या सर्वांमुळे स्थिर वेळापत्रक राखण्यात मोठे अडथळे निर्माण झाले आहेत असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) इंडिगोला शक्य तितक्या लवकर त्यांचे कामकाज सुरळीत करण्याचे निर्देश दिले आहेत आणि या परिस्थितीत कोणतेही भाडे वाढू नये असेही म्हटले आहे.

Indigo Flights : प्रवाशांचे हाल, इंडिगोचं 'वर्क रोस्टर' कुठे बिघडलं? विमानतळावर मोठी गर्दी

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com