जाहिरात
Story ProgressBack

इंडिगो फ्लाइटच्या उपम्यामध्ये मॅगीपेक्षाही अधिक सोडिअम, प्रसिद्ध इन्फ्लुएंसरच्या Vlogमुळे नवा वाद

खाद्यपदार्थाचे रीव्ह्यू देण्यासाठी प्रसिद्ध असलेला इन्फ्लुएंसर रेवंत हिमतसिंग्काच्या नव्या पोस्टमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. नेमका काय आहे विषय?

Read Time: 3 min
इंडिगो फ्लाइटच्या उपम्यामध्ये मॅगीपेक्षाही अधिक सोडिअम, प्रसिद्ध इन्फ्लुएंसरच्या Vlogमुळे नवा वाद
इंडिगो एअरलाइन्स पुन्हा वादात

IndiGo Airlines Food Quality: हवाई प्रवासादरम्यान मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत नवीन वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावर चर्चेला इतके उधाण आले की अखेर एअरलाइन्स कंपनीला प्रवाशाने केलेल्या आरोपावर स्पष्टीकरण द्यावे लागले. तरीही सोशल मीडियावरील युजर्स मोठ्या प्रमाणात आपला संताप व्यक्त करत आहेत. पाकीटबंद खाद्यपदार्थांचे रीव्ह्यू देणारा प्रसिद्ध इन्फ्लुएंसर रेवंत हिमतसिंग्काच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर हा वाद सुरू झाला आहे. ‘फूड फार्मर' या नावाने प्रसिद्ध असलेल्या रेवंतने अलिकडेच इंडिगो एअरलाइन्सच्या (Indigo) फ्लाइटने प्रवास केला. यावेळेस त्याने एअरलाइन्स कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचा रीव्ह्यू आपल्या फॉलोअर्ससह शेअर केला. यानंतर सोशल मीडियावर हा वाद सुरू झाला आहे. 


इंडिगोच्या मॅजिक उपम्यामध्ये मॅगीपेक्षाही अधिक सोडिअम 

रेवंतने आपल्या व्लॉगमध्ये म्हटले आहे की, "इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये दिला जाणाऱ्या मॅजिक उपमा (Magic Upma) या पाकीटबंद पदार्थामध्ये मॅगीपेक्षाही (Maggi) 50 टक्के अधिक सोडिअमचे प्रमाण आहे. तसेच एअरलाइन्सतर्फे देण्यात येणाऱ्या पोहे आणि वरणभातामध्येही इंस्टंट नूडल्सच्या तुलनेत अधिक सोडिअम असते".   

रेवंत हिमतसिंग्काने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे की, "आपल्यापैकी बहुतांश लोकांना माहीतच आहे की मॅगीमध्ये सोडिअम जास्त प्रमाणात असते. इंडिगो एअरलाइन्समध्ये मिळणाऱ्या पाकीटबंद उपम्यामध्ये मॅगीपेक्षाही 50 टक्के अधिक प्रमाणात सोडिअम आहे. तसेच पोह्यामध्येही मॅगीपेक्षा 83 टक्के अधिक सोडिअमची मात्रा आहे आणि वरण-भातामध्येही तितक्याच प्रमाणात सोडिअम आहे". 

पुढे त्याने असेही म्हटले आहे की, "उपमा, पोहे आणि वरण-भारत पौष्टिक आहार म्हणून ओळखला जात असला तरीही हे पदार्थ पौष्टिक असतीलच असे नव्हे".  हिमतसिंग्काने आपल्या व्लॉगमध्ये भारतीयांच्या आहाराशी संबंधित एक महत्त्वपूर्ण बाब देखील मांडली आहे. भारतीय अधिक प्रमाणात सोडिअमचे सेवन करतात आणि नियमित स्वरुपात आवश्यकतेपेक्षाही जास्त मात्रेमध्ये सोडिअमचे सेवन केल्यास उच्च रक्तदाब, हृदय तसेच किडनीशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता असते, असे त्याने अधोरेखित केले.  

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइटने प्रवास करणारा इन्फ्लुएंसर रेवंतने सर्व रेडी-टू-ईट फूड ऑर्डर केले. यानंतर त्याने पदार्थांमधील सोडिअमचे प्रमाण पाहण्यासाठी पाकिटावरील माहिती तपासण्यास सुरुवात केली. यावेळेस त्याला मॅगीपेक्षाही या पदार्थांमध्ये सोडिअम अधिक प्रमाणात आढळले.  

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एअरलाइन्सचे दिले स्पष्टीकरण

इन्फ्लुएंसर रेवंतचा फूड रीव्ह्यू व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर एअरलाइन्स कंपनीला स्पष्टीकरण द्यावे लागले. इंडिगो एअरलाइन्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही केवळ चांगल्या दुकानांमधून ताजे पदार्थ आणि प्री पॅकेज्ड फूडचा प्रवाशांना पुरवठा करतो. प्रवाशांकडे ताजे किंवा प्री-पॅकेज्ड फूड यापैकी एक पर्याय निवडण्याचा किंवा उड्डाणापूर्वी पॅक केलेले खाद्यपदार्थ विकत घेण्याचाही पर्याय असतो. तसेच पदार्थ निवडण्यासाठी प्रवाशांच्या माहितीकरिता खाद्यपदार्थांच्या पाकिटावर माहितीही देण्यात आली आहे".  


सोशल मीडियावर युजर्सकडून संताप व्यक्त 

इन्फ्लुएंसर रेवंतने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर युजर्सकडून याबाबत मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मीडिया 'X' वर हा व्हिडीओ लाखोंच्या संख्येने पाहिला गेला असून व्हिडीओला 7 हजारांहून अधिक लाइकही मिळाले आहेत. यावर एका युजरने कमेंट करत म्हटले की, "उड्डाणादरम्यान आमच्या पौष्टिक आहारामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात सोडिअम लपलेले असेल, याबाबत कोणी विचार केला असेल? दैनंदिन जीवनामध्येही आणखी काय-काय गोष्टी माहीत नसतील, याची मला चिंता वाटते".  

फूड लेबलिंगमध्ये अधिक पारदर्शकता आणणे गरजेचं

आणखी एका युजरने म्हटले आहे की, "ही बाब अतिशय चिंताजनक आहे, पौष्टिक दिसणाऱ्या प्रोडक्ट्समध्ये अशा पद्धतीने सोडिअम पंच कसे काय पॅक करू शकता. पदार्थांची निवड करण्यासाठी फूड लेबलिंगमध्ये अधिक पारदर्शकता आणणे आवश्यक आहे". 

VIDEO : गुढीपाडव्याला श्रीखंड पुरीचा बेत करताय? मग पुण्यातल्या या ठिकाणी भेट द्याच !

आणखी वाचा

ट्रकने बाइकला नेले फरफटत, लटकलेल्या अवस्थेतील बाइकस्वाराचा VIDEO पाहून अंगावर येईल काटा

नया है यह! बाजारात आली सोन्याचांदीची पाणीपुरी, व्हिडीओ पाहून भडकले युजर्स

उद्योगपतीने लेकाला 18व्या वाढदिवशी दिली 5 कोटींची कार, Video पाहून तुम्हीही म्हणाल - 'गिफ्ट असावं तर असं'

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination