जाहिरात

Cyber Fraud: सॉफ्टवेअर इंजिनिअर असूनही प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरला फसवलं, विचित्र भीती दाखवून 50 लाख लुटले

अझीम अहमदने आपली सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी सोडून डिजिटल स्पेसमध्ये प्रवेश केला होता. 2017 मध्ये सुरू झालेल्या त्याच्या पहिल्या इंस्टाग्राम पेजला कोविड लॉकडाऊन दरम्यान मोठा प्रतिसाद मिळाला.

Cyber Fraud: सॉफ्टवेअर इंजिनिअर असूनही प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरला फसवलं, विचित्र भीती दाखवून 50 लाख लुटले
influencer Azim Ahmedextorted by cyber frauds

मध्य प्रदेशातील जबलपूर शहरात सायबर फसवणुकीचा विचित्र प्रकार समोर आला आहे. एका प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरला सायबर भामट्यांनी जवळपास 50 लाखांना गंडा घातला आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला आणि नंतर इंस्टाग्राम इन्फ्लूएन्सर बनलेला 28 वर्षीय अझीम अहमद याला त्याच्या पेजवर 'स्ट्राइक' टाकून ते बंद करण्याची धमकी देत फसवण्यात आलं आहे. 

जबलपूरचा हा प्रसिद्ध इंस्टाग्राम क्रिएटर आणि आयटी इंजिनिअर असूनही, तो या डिजिटल खंडणी रॅकेटच्या जाळ्यात अडकला. त्याचे 96 इंस्टाग्राम पेजेस असून त्यावर एकूण 5.7 कोटी फॉलोअर्स आहेत.

(नक्की वाचा- Pune News: 'पुणेकर विरुद्ध बाहेरचे' आमने-सामने! "चालले, परत येऊ नका" पोस्टरला तरुणाचं सडेतोड उत्तर)

फेक स्ट्राईकची धमकी आणि 50 लाखांची वसुली

सायबर गुन्हेगारांनी अझीम अहमदच्या इन्स्टाग्राम पेजला स्ट्राइक आणि बॅन करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याच्याकडून 50 लाख रुपयांची वसुली केली. आपली लाखो रुपयांची कमाई थांबेल या भीतीने अझीम सतत या खंडणीखोरांना पैसे देत राहिला. अखेर त्याने जबलपूरच्या सायबर सेलमध्ये याची तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप सायबर गुन्हेगारांचा कोणताही सुगावा लागलेला नाही.

सॉफ्टवेअर इंजिनिअर ते डिजिटल क्रिएटर

अझीम अहमदने आपली सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी सोडून डिजिटल स्पेसमध्ये प्रवेश केला होता. 2017 मध्ये सुरू झालेल्या त्याच्या पहिल्या इंस्टाग्राम पेजला कोविड लॉकडाऊन दरम्यान मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्याने मित्रांसोबत मिळून 'व्हूपी डिजिटल' (Whoopy Digital) नावाचे डिजिटल मार्केटिंग स्टार्टअप देखील सुरू केले.

(नक्की वाचा -  Dhule News: दूध आहे की रबर! भेसळयुक्त दुधाचा धक्कादायक VIDEO)

नवीन सायबर क्राईम ट्रेंड

मात्र, गेल्या वर्षभरापासून सायबर गुन्हेगारांनी त्याला फेक कॉपीराईट स्ट्राईकची सतत धमकी देऊन त्याला वेठीस धरले. अझीमच्या म्हणण्यानुसार, सायबर गुन्हेगार त्याला फोन कॉल करत होते आणि इन्स्टाग्राम स्ट्राईकचे ईमेल्स देखील पाठवत होते, जे तपासणीत बनावट असल्याचे सिद्ध झाले. फोन करणारे स्वतःला मीडिएटर म्हणून सांगत असत. एक फेक स्ट्राईक काढण्यासाठी त्यांनी अझीमकडून 25,000 ते 30,000 घेतले.

जबलपूर सायबर सेलचे प्रभारी नीरज नेगी यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, फेक कंटेंट स्ट्राईकच्या नावावर धमकी देण्याचे हे प्रकरण त्यांच्या निदर्शनास आले असून, हा नवीन प्रकारचा सायबर क्राईम ट्रेंड आहे. सायबर गुन्हेगार इन्स्टाग्रामच्या ऑटोमेटेड कंटेंट सिस्टिमचा गैरफायदा घेत होते. कारण युजर्सना असे बनावट ईमेल्स सतत मिळाल्यास त्यांचे अकाउंट सस्पेंड होण्याची भीती असते. सायबर सेलने इन्स्टाग्रामच्या अंतर्गत टीमशी संपर्क साधला असून, या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com